Lockdown again in this country, three weeks 'off' in israel. benjamin netnyahoo
'या' देशात पुन्हा लॉकडाऊन, तीन आठवड्यांचा 'बंद' By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 11:27 AM2020-09-14T11:27:27+5:302020-09-14T11:32:03+5:30Join usJoin usNext इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीनामा द्यावा, या मागणीसाठी त्यांच्या घरासमोर हजारो लोकांनी शनिवारी निदर्शने केली. कोरोना महामारीच्या उद्रेकाची स्थिती योग्यपणे हाताळली नसल्याचाही त्यांच्यावर आरोप करीत लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इस्रायलमध्ये दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत आहे. यहुदी नववर्षापूर्वीच पुन्हा एकदा इस्रायलमध्ये देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. पोलिसांनी शनिवारी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. नेतन्याहू यांनी निदर्शकांना अराजकतावादी म्हटले आहे. इस्रायलमध्ये शुक्रवारपासून दुसरा लॉकडाऊन करण्यात येत असून हा लॉकडाऊन तीन आठवड्यांचा असणार आहे. सध्या, इस्रायलमध्ये कोरोनाचे १,५०,००० रुग्ण आढळले असून, १,१०० पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. इस्रायलमध्ये दररोज 4 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे हे लॉकडाऊन करण्यात येत आहे. या लॉकडाऊनची मोठी किंमत देशाला चुकवावी लागणार असल्याचेही नेतन्याहू यांनी म्हटलंय. यहुदी नववर्षापूर्वीच देशात लॉकडाऊन करण्यात येत असल्याने तेथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनाही हा निर्णय मान्य नसल्याचे समजते. कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाण्याच्या विरोधात प्रमुख मंत्री याकोव लित्जमॅन यांनी राजीनामा दिला. महामारीच्या प्रारंभी आरोग्यमंत्री राहिलेले व सध्या आवासमंत्री असलेले याकोव यांनी लॉकडाऊनच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. इस्रायलमधील लॉकडाऊनमध्ये 10 पेक्षा जास्त लोक घरात नसावेत, आणि 20 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येण्याचे बंधन घालण्यात आले आहे. शाळा व शॉपिंग सेंटर बंद करण्यात येत आहेत, नागरिकांना आपल्या घराजवळील 500 मीटर अंतरापर्यंतच बाहेर निघण्यास मुभा देण्यात आली आहे. गैरसरकारी कार्यालय व उद्योग खुले राहतील, पण ग्राहकांना व नागरिकांना तेथे जाण्यास परवानगी नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. देशातील सुपर मार्केट व औषधांची दुकाने अत्यावश्यक सेवा असल्याने सुरुच राहणार आहेत. Read in Englishटॅग्स :इस्रायलकोरोना वायरस बातम्याबेंजामिन नेतन्याहूIsraelcorona virusBenjamin netanyahu