ब्रिटनमधील सर्वांत महागडा घटस्फोट, वडिलांतर्फे मुलगा देणार आईला ७६० कोटी रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:12 PM 2021-04-26T15:12:30+5:30 2021-04-26T15:24:36+5:30
divorce case : हा ब्रिटनमधील सर्वात महागडा घटस्फोट असल्याचे म्हटले जाते. घटस्फोटाची बरीच प्रकरणे समोर येत राहतात, ज्यात कधीकधी एक पक्ष दुसऱ्या पक्षाला भरपूर पैसे देतो. असेच ब्रिटनमधील घटस्फोटाचे एक प्रकरण समोर आले आहे, याठिकाणी पती-पत्नीमधील घटस्फोटाच्या वादात मुलाकडून आईला सुमारे 760 कोटी रुपये दिले जाणार आहेत. हा ब्रिटनमधील सर्वात महागडा घटस्फोट असल्याचे म्हटले जाते.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, लंडनच्या कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे. हे संपूर्ण प्रकरण लंडनमधील फरहाद-तातियाना या जोडप्याशी आणि त्यांचा मुलगा तैमूर याच्याशी संबंधित आहे. न्यायाधीशांनी आपल्या निकालामध्ये आरोपी मुलाचे नाव बेईमान असल्याचे सांगितले, जो आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी काहीही करू शकतो.
काय आहे संपूर्ण प्रकरणः वडिलांची संपत्ती सामायिक केली जाऊ नये आणि घटस्फोटाच्यावेळी आईला अधिक नुकसानभरपाई मिळू नये, अशी तैमूरची अशी इच्छा होती.
या अहवालानुसार न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, अब्जाधीश फरहादचा मुलगा तैमूरने आपल्या वडिलांची संपत्ती लपविली आहे.
पैसे लपविण्याच्या आरोपावरून तैमूरने सांगितले होते की, त्याने कॉलेजचा विद्यार्थी असताना व्यवसाय केला होता, त्यात त्याचे नुकसान झाले होते. त्याने असा युक्तिवाद केला की आपण आपल्या वडिलांचे पैसे आईपासून लपवले नाही तर व्यवसाय करत असताना या पैशांचे नुकसान झाले.
आपल्या आदेशात न्यायाधीशांनी असे सांगितले की, तैमूर आपल्या आईला वैवाहिक मालमत्तेचा एक पैसा घेण्यास कसे रोखू शकतो. तैमूरची आई तातियानाची बाजू न्यायाधीशांना देखील जाणून घ्यायची होती.
घटस्फोटाच्यावेळी मिळणाऱ्या संपत्तीमध्ये लंडनमधील लक्झरी अपार्टमेंट सुद्धा मिळाली पाहिजे, अशी आईची इच्छा होती. दरम्यान, ती त्या बदल्यात पैसे घेण्यास तयार होती.
शेवटी न्यायाधीशांनी आपला निकाल सुनावला. न्यायाधीशांनी आदेश दिला की तैमूर आता त्याच्या आईला १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ७६० कोटी रुपये देईल.
हा कौटुंबिक वाद कसा वाढला: अहवालानुसार तैमूरचे वडील फरहाद यांचा जन्म अझरबैजानमध्ये झाला होता. नोव्हेंबर २०१२ मध्ये फरहदने १.४ अब्ज डॉलर्समध्ये रशियन गॅस उत्पादकाचा आपला हिस्सा विकून इतकी मोठी संपत्ती निर्माण केली. मात्र, पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी नुकसान भरपाई म्हणून एक पैसा सुद्धा देण्यास नकार दिला होता.
घटस्फोटानंतर तातियानला काहीही मिळाले नाही, त्यामुळे तिने गुन्हा दाखल केला. इतकेच नाही तर तिने त्यांच्याविरोधात कमीतकमी 6 देशांत गुन्हा दाखल केला. यानंतर लंडनच्या कोर्टाने हा निर्णय दिला. मात्र, फरहद यांनी कोर्टाच्या निर्णयाला चुकीचे आणि दिशाभूल करणारे म्हटले आहे.