Coronavirus : कोरोनाची अशीही दहशत; चीनच्या सलून्समध्ये लाँग डिस्टन्स हेअर कट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 02:47 PM2020-03-05T14:47:32+5:302020-03-05T15:01:13+5:30

Coronavirus : कोरोनाची अशीही दहशत; चीनच्या सलून्समध्ये लाँग डिस्टन्स हेअर कट

चीनमधून जगात पसरलेल्या कोरोना विषाणूनं आतापर्यंत तीन हजारांहून अधिक जणांचा जीव घेतला आहे. चीनमधल्या तब्बल ८० हजारहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. चीनमधले बहुतांश जण मास्क लावूनच फिरत आहेत.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. मात्र अद्याप तरी या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.

चीनमधल्या दैनंदिन जीवनावर कोरोनाचा प्रचंड परिणाम झाला आहे. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी हरतऱ्हेचे उपाय केले जात आहेत.

चीनमधल्या हेअर कटिंग सलूनमध्येही कोरोनाची दहशत पाहायला मिळते आहे.

सलूनमधल्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. ते तीन ते चार फुटांवरुन ग्राहकांचे केस कापत आहेत.

जवळून केस कापताना सलूनमधील कर्मचाऱ्यांना केसांचा व्यवस्थित अंदाज येतो. लांबून केस कापताना मात्र हेअर स्टाईल बिघडण्याची जास्त भीती असते.

चीनमधल्या सलूनमध्ये ३ ते ४ फुटांवरुन केस कापले जात आहेत. या लाँग डिस्टन्स हेअर कटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेनान प्रांतातल्या कित्येक सलूनमध्ये लाँग डिस्टन्स हेअर कट केला जात आहे. सलूनमधले कर्मचारी तीन ते चार फुटांच्या काठीला कात्री, ट्रिमर, ब्रश, कंगवा लावून केस कापत आहेत.

हेनान भागातली परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. मात्र सलूनमधले कर्मचारी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीत.

काठीला कात्री, ट्रिमर, ब्रश, कंगवा लावून केस कापताना सलूनमधल्या कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत करावी लागते आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कर्मचारी ही मेहनत घेत आहेत.

सार्वजनिक स्थळांवर एकमेकांपासून ५ फूट दूर राहण्याच्या सूचना चीन सरकारनं दिल्या आहेत.