महात्मा गांधींच्या घराण्यातील 'या' तरुणीचा हॉलिवूडमध्ये डंका; जाणून घ्या काय आहे नातं By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 02:25 PM 2024-10-02T14:25:51+5:30 2024-10-02T14:32:37+5:30
महात्मा गांधी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. महात्मा गांधी यांना जगभरात आदराचे स्थान आहे. देशातच नाही तर परदेशातही लोक त्यांच्या विचारांचे पालन करतात. आज गांधी जयंती असून संपूर्ण देश त्यांचे स्मरण केले जात आहे.
देशासाठी महात्मा गांधी यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासोबतच त्यांच्या जीवनाबद्दल आणि कुटुंबाबद्दलही लोकांना जाणून घ्यायची उत्सुकता असते. महात्मा गांधी यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा हॉलीवूडशी थेट संबंध आहे. महात्मा गांधी यांच्या पाचव्या पिढीतील ही तरुणी त्यांच्याप्रमाणे साधे जीवन जगत नाही तर ग्लॅमरस जीवन जगते.
तुम्हाला माहित आहे का की महात्मा गांधींची एक पणती आहे जी अमेरिकेत राहते. कांतीलाल गांधी हे महात्मा गांधींचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल यांचे पुत्र होते आणि त्यांच्या नातीचे नाव मेधा गांधी आहे. त्या अमेरिकेत राहतात.
कांतीलाल यांचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. साबरमती आश्रमातून निघालेल्या दांडीयात्रेत सहभागी झालेले कांतीलाल हे महात्मा गांधींचे नातू आहेत. त्यावेळी २० वर्षांचे कांतीलाल गांधी हे आजोबा महात्मा गांधींसमोर पिशवी घेऊन चालत असत.
मेधा गांधी या हॉलिवूडमधील कलाकार आहे. मेधा या एक विनोदी लेखिका आहेत. त्या अनेक शोसाठी स्क्रिप्ट लिहितात. यासोबतच मेधा गांधी या अप्रतिम गायिका आहेत. एवढेच नाही तर त्या निर्मात्याही आहेत. मेधा या अमेरिकेतील प्रसिद्ध शो 'डेव्ह अँड शो'च्या निर्मात्याही होत्या. याशिवाय त्यांनी 'मॅटी इन द मॉर्निंग शो'ची निर्मितीही केली आहे.
मेधा गांधी यांच्या सोशल मीडिया बायोनुसार, त्या 'एल्विश डुरान अँड द मॉर्निंग शो'च्या होस्ट देखील आहे. सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठे अपडेट त्या शेअर करत असतात. सोशल मीडियावर मेधा यांचे जवळपास अडीच लाख फॉलोअर्स आहेत.
मेधा गांधी ग्लॅमरस आणि स्टायलिश आयुष्य जगतात. महात्मा गांधींच्या अगदी विरुद्ध. त्यांच्या कपड्यांच्या शैलीवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे. मेधा गांधींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्या ब्रँडन जोन्स नावाच्या परदेशी व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
मेधा त्यांच्या लव्ह लाईफबद्दलही बोलायला मागे नाहीत. सोशल मीडियावर त्यांच्या बॉयफ्रेंडसोबतचे अनेक फोटो आहेत.