male body builder nurse shares photo before after coronavirus impact on body
CoronaVirus News: कोरोनाचा 'भयानक' परिणाम! सुकून पार 'असा' झाला 'बॉडी बिल्डर', पहा - Photo By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:00 PM2020-05-22T18:00:50+5:302020-05-22T18:22:25+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरस आपल्या शरीरावर केवढा परिणाम करतो, याचा अंदाज येण्यासाठी हा फोटो पुरेसा आहे. कोरोना जबरदस्त तब्बेत असणाऱ्यांनाही पार कृश बनवतो. यामुळे शरिरात केवळ जीवच राहतो. शक्ती रहात नाही. व्यक्ती पार अशक्त होते. एका अमेरिकन नर्सने काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो फार भयावह आहेत... 43 वर्षीय नर्स माइक शल्ट्ज गेल्या 2 महिन्यांपासून कोरोनाबाधितांवर उपचार करत होते. मात्र, एक दिवस ते स्वतःच कोरोना संक्रमित झाले. बोस्टन येथील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. काही दिवसांनंतर त्यांनी तेथील एका नर्सला विचारले, की मी येथे किती दिवसांपासून भरती आहे. तेव्हा समजले 6 आठवडे. या सहा आठवड्यांत माइक यांनी आपली बनवलेली बॉडी गमावली होती. ते अत्यंत अशक्त झाले होते. माइक म्हणतात, फोन उचलू शकेल एवढे त्राणही त्यांच्यात नव्हते. त्यांना मेसेजदेखील टाईप करता येत नव्हता. कारण त्यांची बोटेदेखील थरथरत होती. माइक सांगतात, की हे अत्यंत भीतीदायक होते. मीच जगातील सर्वात अशक्त व्यक्ती आहे, असे मला वाटत होते. कोरोना होण्यापूर्वी माइक यांचे वजन 87 किलो होते. तर कोरोनानंतर ते 63 किलोवर आले. कोरोना काळात त्यांचे वजन तब्बल 24 किलोंनी कमी झाले. माइक यांना वटत होते, की आपण एवढी सावधगिरी बाळगतो. सर्वांची सेवा करतो. तब्येतही उत्तम आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोरोना अॅटॅक होणार नाही. मात्र, कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांची तब्येत आता अशी झाली आहे. माइक आठवड्याला 7 ते 8 वेळा जिम मारतात. माइक यांनी आपला आणि आपल्या एका मित्राचा फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यांचे तब्बल 30 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांनी कोरोनापूर्वी आपण कसे होते आणि आता कसे झालो, हे एका पिक्चरमधून दाखवले आहे. कोरोनानंतर हा फोटो घेतानाही त्यांनी बराच त्रास झाला होता. त्यांना बेडवरून उठताही येत नव्हते. माइक मार्चच्या सुरुवातीला मियामी बीचवर झालेल्या एका विंटर पार्टी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. या पार्टीत सहभागी झालेल्या तब्बल 38 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैंकी तिघांचा मृत्यू झाला. ही पार्टी 4 मार्च ते 10 मार्चपर्यंत सुरू होती. या पार्टीत तब्बल 10 हजार लोक सहभागी झाले होते. माइक यांना रुग्णालयातून आणण्यासाठी त्यांचा मित्र डीजे जोश हेब्बलेवेट गेले होते. माइक त्यांचे आभार मानत म्हणाले, जोशने माझ्यासाठी बरेच काही केले आहे. हे दोघेही एकाच कारमधून घरी जाताना दिसत आहेत. माइक म्हणाले, मी एकूण 8 आठवडे आपले घर, कुटुंबीय आणि नातलगांपासून दूर आहे. आता मी हळू-हळू बरा होत आहे. लवकरच बरा होऊन पुन्हा कामावर जाईल. (सर्व फोटो- माइक शल्ट्ज/इन्स्टाग्राम)Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याशरीरसौष्ठववैद्यकीयहॉस्पिटलcorona virusbodybuildingMedicalhospital