पराभूत डोनाल्ड ट्रम्प यांना बसणार आणखी एक धक्का; मेलानिया घटस्फोट देण्याच्या तयारीत? By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 02:10 PM 2020-11-08T14:10:10+5:30 2020-11-08T14:22:07+5:30
Donald Trump And Melania Trump Divorce : अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आता आणखी एक धक्का बसणार आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.
मतदानानंतर मतमोजणीवरून बरेच दिवस पेच चालल्यानंतर अखेर अध्यक्षीय निवडणुकीत ज्यो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा काल झाली. तसेच बायडन यांच्यासोबत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या.
अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आता आणखी एक झटका बसणार आहे. कौटुंबिक धक्का बसण्याची शक्यता आहे. मेलानिया डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
डेल मेलने दिलेल्या वृतानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना मेलानिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत आहेत. मेलानिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगी स्टेफनी वोल्कॉफने हा दावा केला आहे.
स्टेफनी वोल्कॉफने डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्यातील काही वर्षांचं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला असल्याचा दावा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे.
मेलानियाने मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीत अर्धा वाटा मागितला आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनी देखील ट्रम्प आणि मेलानिया या दोघांच्या नात्यात तडा गेल्याचा दावा केला आहे.
15 वर्षांपासून एकत्र असणाऱ्या ट्रम्प दाम्पत्यांचं नातं संपुष्टात आलं आहे असं ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा बदला घेण्यासाठी मेलानिया ट्रम्प सध्या रस्ता शोधत असल्याचं म्हटलं जात आहे.
1998 मध्ये मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. त्यावेळी ट्रम्प यांचं वय 52 होत तर मेलेनिया याचं 28 वर्षांच्या होत्या. त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीक सुरू होता.
टाईम्स स्क्वेअरच्या किटकॅट क्लबमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या.
2004 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 1.5 मिलिअन डॉलरची डायमंड रिंग मेलेनियाला देत लग्नाची मागणी घातली होती. 22 जानेवारी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे.
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी पॉप्युलर वोट्समध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बायडन यांना 75 मिलियन हून अधिक मते मिळाली आहेत.
अमेरिकेत झालेल्या मतदानापैकी 50 टक्क्यांहून अधिक मते बायडन यांना मिळाली. बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा रेकॉर्ड मोडला आहे. ओबामा यांना 2008 मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 69,498,516 मते मिळाली होती.