धक्कादायक! 'त्याने' आत्महत्या करण्यासाठी स्वत:च प्रायव्हेट पार्ट कापला, डॉक्टरांनी जोडून बनवला रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:33 PM2021-08-24T12:33:03+5:302021-08-24T12:46:26+5:30

ही व्यक्ती स्तिजोफ्रेनिया नावाच्या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर जखमांचे निशाण आढळून आले होते.

ब्रिटनमधून एका व्यक्तीची फारच क्रिटिकल केस समोर आली आहे. या व्यक्तीने आत्महत्या करण्यासाठी स्वत:च्याच प्रायव्हेट पार्टला तोडून वेगळं केलं होतं. या व्यक्तीच्या गंभीर जखमेनंतर केवळ ६ आठवड्यात डॉक्टरांनी त्याचा प्रायव्हेट पार्ट पूर्ण ठीक केला आहे.

या व्यक्तीच्या केसबाबत ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. ३४ वर्षीय या व्यक्तीने किचनमधील चाकूने आपल्या प्रायव्हेट पार्टवर वार केला होता.

जेव्हा पोलीस या व्यक्तीच्या घरी पोहोचले तेव्हा तो बेशुद्ध पडला होता. त्याच्या प्रायव्हेट पार्टला बर्फात ठेवण्यात आलं आणि त्याला लगेच अॅम्बुलन्सने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

ही व्यक्ती स्तिजोफ्रेनिया नावाच्या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर जखमांचे निशाण आढळून आले होते.

यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलबर्मिंघम एनएचएस फाउंडेशन ट्रस्टनुसार, सर्जरी यशस्वी करण्यासाठी प्रायव्हेट पार्टला इंजरीच्या १५ तासांच्या आत रिप्लांट करणं गरजेचं असतं.

जेव्हा या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं आणि त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन सर्जरी करण्यात आली तेव्हा या व्यक्तीचा प्रायव्हेट वेगळा होऊन २३ तास झाले होते. अशात डॉक्टरांनी ही सर्जरी आव्हानात्मक होती.

डॉक्टरांनी या व्यक्तीच्या जखमी झालेल्या प्रायव्हेट पार्टला रिअटॅच केलं होतं आणि ब्लड फ्लोसाठी रूग्णाच्या बगलेतील नसेचा वापर करण्यात आला होता.

सर्जरीनंतर जनरल वॉर्डमध्ये त्याला नेण्यात आलं होतं आणि त्याला अॅंटीबायोटिक्स देण्यात आलं. त्याला दोन आठवडे जनरल वार्डात ठेवण्यात आलं होतं.

यानंतर त्याला एक सायकियाट्रिक वार्डात ट्रान्सफर करण्यात आलं होतं. या सर्जरीच्या सहा आठवड्यांनंतरच रूग्णाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सेंसेसन होऊ लागलं होतं. आणि तो सामान्य होऊ लागला होता.

या सर्जरीसंबंधी डॉक्टरांनी सांगितलं की, अवयव वेगळा झाल्यावर अनेक तास उलटून गेल्यावरही प्रायव्हेट पार्टची यशस्वी सर्जरी होण्याची ही पहिली डॉक्यूमेंटेड केस आहे.