लहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 05:43 PM2018-11-20T17:43:39+5:302018-11-20T17:55:41+5:30

जगभरातल्या लहानग्यांचं आवडीचं कार्टून मिक्की माऊसला 90व्या जन्मदिनाच्या निमित्तानं एक विशेष गिफ्ट मिळालं आहे.

मिक्की माऊसच्या भूमिकेची प्रेरणा मिळालेला चित्रपट काहीसा कालौघात गेला होता. तो हरवलेला चित्रपट जपानमध्ये पुन्हा सापडला आहे.

मिक्की माऊसला 90व्या जन्मदिनानिमित्त वॉल्ट डिझनीनं जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचं आयोजन केलं.

मिक्कीवर बनवण्यात आलेल्या पहिल्या चित्रपटाचं प्रदर्शन 18 नोव्हेंबर 1928 रोजी करण्यात आलं होतं.

ज्याला आता 90 वर्षं पूर्ण झाली आहेत.

हा चित्रपट कार्टूनशी संबंधित असलेला इतिहासकार यासुशी वातानबे यांच्याकडे सापडला आहे.

नेक एन नेक नावाच्या 16 एमएमचा चित्रपट असलेल्या 'ओस्वाल्ड : द लकी रॅबिट'पासून मिक्कीची प्रेरणा मिळाली होती.