Pakistani Hindus: कंगाल पाकिस्तानातील करोडपती हिंदू, प्रचंड संपत्ती; फॅशनपासून राजकारणापर्यंत दबदबा By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:32 PM 2023-01-22T15:32:42+5:30 2023-01-22T15:37:23+5:30
Pakistani Hindus: इस्लामिक देश असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि त्यांची वाईट अवस्था याबाबतच्या बातम्या नियमितपणे येत असतात. मात्र याच पाकिस्तानामध्ये काही मोजकी हिंदू कुटुंबं ही प्रतिष्ठा राखून आहेत. तसेच त्यांच्याकडे प्रचंड संपत्तीची मालकी आहे. इस्लामिक देश असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि त्यांची वाईट अवस्था याबाबतच्या बातम्या नियमितपणे येत असतात. मात्र याच पाकिस्तानामध्ये काही मोजकी हिंदू कुटुंबं ही प्रतिष्ठा राखून आहेत. तसेच त्यांच्याकडे प्रचंड संपत्तीची मालकी आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे पाकिस्तानच्या सार्वजनिक जीवनाच हिंदू अल्पसंख्याकांना फारसे स्थान नसले तरी या करोडपती हिंदूंनी, ग्लॅमर जगत, स्पोर्ट्स आणि राजकारणासारख्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेला आहे. यामध्ये दीपक परवानी, नवीन परवानी, खाटुमल जीवन आणि रीता ईश्वर अशा काही नावांचा समावेश आहे.
दीपक परवानी पाकिस्तानी फॅशन आणि फिल्म इंडस्ट्रीमधील चर्चित नाव आहे. दीपक पवरानी हिंदू सिंधी समुदायाशी संबंधी आहेत. २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार दीपक यांचं वार्षिक उत्पन्न ७१ कोटी रुपयांच्या आसपास आहे. तसेच फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पाकिस्तानचे प्रसिद्ध स्नूकर खेळाडू राहिलेले नवीन परवानी हे दीपक परवानी यांचे चुलत भाऊ आहेत. २००६ च्या दोहा आशियाई स्पर्धेत त्यांनी पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं होतं. नवीन परवानी यांचं वार्षिक उत्पन्न हे ६० कोटी रुपये एवढं आहे.
पाकिस्तानच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या रीता ईश्वर ह्या २०१३ पासून २०१८ पर्यंत पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीच्या अध्यक्ष होत्या. रीता ईश्वर पाकिस्तानमधील पाकिस्तान मुस्लिम लीग एफ पक्षाशी संबंधित आहेत. त्यांचा पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत महिला नेत्यांमध्ये समावेश होतो. त्यांचं वार्षिक उत्पन्न हे सुमारे ३० कोटी रुपयांच्या आसपास आहे.
खाटूमल जीवन पाकिस्तानमधील सिंध प्रांताशी संबंधित आहेत. ते पाकिस्तान पीपल्स पार्टीशी संबंधित आहेत. खाटूमल जीवन हे हिंदू सिनेटर राहिलेले आहेत. एका रिपोर्टनुसार त्यांचं वार्षिक उत्पन्न १५ कोटी रुपये एवढं आहे.