This model has made a big mistake in photoshooting, now the government is going to penalize
या मॉडेलने फोटोशूट करताना केली मोठी चूक, आता सरकार आकारणार दंड By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 08:41 PM2017-09-24T20:41:18+5:302017-09-24T20:48:00+5:30Join usJoin usNext रशियाच्या एका मॉडेलला सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करणं चांगलंच महागात पडलं आहे. (सर्व फोटो सौजन्य -thesun.co.uk) तिने काढलेल्या या फोटोंमुळे रशिया सरकार आता तिच्यावर दंड आकारण्याची तयारी करत आहे. रशियाच्या वोल्गोग्राद शहरात राहणारी मॉडेल नटालिया गुरोवा हिने काही दिवसांपूर्वी रशियात दुर्मिळ झालेल्या ‘पिंक लोटस’ ‘नेलुंबो’ सोबत आपले काही फोटो पोस्ट केले होते. पण पर्यावरण तज्ञांची नजर या फोटोंवर पडली आणि त्यांनी तिच्याकडून दंड आकारण्याची तयारी सुरू केली आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अधिका-यांनी या फोटोंची चौकशी सुरू केली आहे.