जगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 04:43 PM2018-08-21T16:43:43+5:302018-08-21T17:26:38+5:30

तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच माणसाने जगात विविध थक्क करणाऱ्या गोष्टी बनवल्या आहेत. पर्वत, नद्या, समुद्रांवर बांधलेले मोठाले पूल ही मानवी बुद्धिमत्तेचीच किमया. मात्र यापैकी काही पूल हे तेथून जाणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणण्यासाठीच बनवण्यात आले की काय अशी शंका येते.

चीनच्या झांगजियाजी प्रांतात बनवण्यात आलेले ब्रिज जगातील सर्वात खतरनाक ब्रिजपैकी एक आहे. 100 मीटर लांब असलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूला पर्वत आणि खाली 300 मीटर खोल दरी आहे. त्यामुळे येथून जाताना हृदयाचा ठोका चुकतो.

पाकिस्तानमधील हुसैनी ब्रिजचा समावेशही धोकादायक ब्रिजमध्ये होतो. अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या ब्रिजचा समावेश अजूनही होतो.

जपानमधील एशिमा शाशी ब्रिजचा समावेशही वैचित्र्यपूर्ण आणि धोकादायक ब्रिजमध्ये होतो. हे ब्रिज मेत्सु आणि कासाईमेनिटो या ब्रिजना जोडते.

व्हिएतनाममधील मंकी ब्रिजही वैचित्र्यपूर्ण आहे. या ब्रिजवरून जाणारा माणूस माकडासारखा दिसतो.

अमेरिकेतील कोलोराडो येथील रॉयल जॉर्ज सस्पेंशन ब्रिज हे अमेरिकेतील सर्वात उंच सस्पेंशन ब्रिज आहे.