सर्वात प्रगत अमेरिका मातामृत्यूत आजही आघाडीवर; बाळंतपणात महिलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:41 AM2024-06-27T11:41:37+5:302024-06-27T11:49:49+5:30

आपल्या देशाला हे शोभणारं नाही, अशी खुद्द अमेरिकन नागरिकांचीच खदखद आहे.

वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळे आज मृत्यूचं प्रमाण जसं खूपच कमी झालं आहे, त्याचप्रमाणे लोकांच्या आयुष्यमानातही बरीच वाढ झाली आहे.

लाइफस्टाइलमुळे अनेक नवे आजार निर्माण झाले असले तरी काही जुने, जीवघेणे आजार मात्र जवळपास नामशेष झाले आहेत.

पूर्वीच्या काळी बाळंतपणात महिलांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू व्हायचे. ते प्रमाणही आता खूपच कमी झालं आहे.

विकसित देशांत तर हे प्रमाण अत्यल्प आहे. पण ‘सर्वशक्तिमान’ आणि सर्वांत प्रगत देश अमेरिका मात्र याला अपवाद आहे.

बाळंतपणातील महिलांचे मृत्यू अमेरिकेत आजही तितकेसे कमी झालेले नाहीत. एक लाख लोकसंख्येमागे अमेरिकेत आजही तब्बल २१पेक्षा अधिक महिला बाळंतपणात मृत्युमुखी पडतात.

आपल्या देशाला हे शोभणारं नाही, अशी खुद्द अमेरिकन नागरिकांचीच खदखद आहे.

अमेरिका (२१.१), कॅनडा (११.०), ब्रिटन (९.८), फ्रान्स (७.९), जर्मनी (४.४), जपान (४.३), स्पेन (३.४), नॉर्वे (१.७).

संदर्भ : OECD - आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना, जागतिक आरोग्य संघटना