जगातील सर्वाधिक 'पॉवरफुल' पासपोर्ट; पाहा, भारत कितव्या स्थानावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:38 AM2020-01-13T10:38:52+5:302020-01-13T10:53:42+5:30

जगातील अनेक देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. हेनले पासपोर्टने जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट्सची यादी जारी केली आहे. कोणत्या पासपोर्टमुळे किती देशांमध्ये 'व्हिसा फ्री' किंवा 'व्हिसा ऑन अराइव्हल' मिळतो. या आधारावर याची रँकिंग करण्यात आली आहे.

जपानच्या पासपोर्ट धारकांसाठी जगातील सर्वाधिक देशांनी दरवाजे खुले केले आहेत. जर आपल्याजवळ जपानचा पासपोर्ट आहे, तर जगातील जवळपास 191 देशांमध्ये आपल्याला 'व्हिसा फ्री' किंवा 'व्हिसा ऑन अराइव्हल' दिली जाते.

या यादीत आशियाचा दबदबा आहे. सिंगापूर 190 च्या स्कोरसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण कोरिया आणि जर्मनी 189 च्या स्कोरसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

युरोपीय देशांनी पहिल्या 10 मध्ये स्थान मिळविले आहे. फिनलँड आणि स्पेन चौथ्या क्रमांकावर आहे. लग्जमबर्ग आणि डेनमार्क पाचव्या स्थानावर आहे. तर स्वीडन आणि फ्रान्स सहाव्या स्थानावर आहे.

दरम्यान, अमेरिका आणि युकेच्या रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. हे दोन्ही देश संयुक्तरित्या आठव्या स्थानवर आहे. पाच वर्षांपूर्वी 2015 मध्ये हे देश पहिल्या क्रमांकावर होते.

भारताचीही पासपोर्ट रँकिंगमध्ये दोन स्थानकांनी घसरण झाली आहे. 2020 च्या रँकिंकमध्ये भारत 84 व्या स्थानावर आहे.

आर्यलँड सातव्या स्थानावर आहे. 2019मधील रेकॉर्डनुसार 900,000 आयरिश पासपोर्ट जारी करण्यात आले.

गेल्या दहा वर्षांत यूएईने मोठी आघाडी घेतली आहे. यूएई 18 व्या स्थानावर आहे.

अफगाणिस्तानचा पासपोर्ट या रँगिंगमध्ये सर्वात खालच्या स्थानवर आहे. येथील पासपोर्टधारकांना फक्त 26 देशांसाठी 'व्हिसा फ्री' किंवा 'व्हिसा ऑन अराइव्हल' दिला आहे.