पृथ्वीवरील अत्यंत दुर्गम ठिकाणे, इथे जाणे आहे मृत्यूला आव्हान देण्यासारखे By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:44 PM 2019-11-13T15:44:28+5:30 2019-11-13T16:01:19+5:30
या पृथ्वीवर अनेक अजब-गजब ठिकाणे आहेत. एकीकडे पृथ्वीवर नयनरम्य निसर्गसौंदर्य आहे. तसेच दुसरीकडे काही अत्यंत दुर्गम अशी ठिकाणेही आहेत. तिथे जाणे हे जणू मृत्यूला आव्हान देण्यासारखेच आहे. अशाच काही ठिकाणांचा घेतलेला हा आढावा.
पूर्व अंटार्क्टिक पठार पूर्व अंटार्क्टिक पठार ही पृथ्वीवरील सर्वात थंड जागा आहे. कधी कधी रात्रीच्या वेळी येथील तापमान हे उणे 92 अंशांपर्यंत जाते.
डेथ व्हॅली, अमेरिका अमेरिकेमधील डेथ व्हॅली हे जगातील सर्वात गरम ठिकाण आहे. 10 जुलै 1913 रोजी येथील तापमना 56.7 डिग्री एवढे नोंदवले गेले होते.
माऊंट एव्हरेस्ट, नेपाळ माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच ठिकाण आहे. माऊंट एव्हरेस्टची उंची 8 हजार 848 मीटर एवढी आहे. हे शिखर सर करणे हे सर्वात कठीण मानले जाते.
चॅलेेंजर डीप, पॅसिफिक महासागर पॅसिफिक महासागरातील चॅलेंजर डीप ही जगातील सर्वात खोल जागा आहे. याची खोली सुमारे 11 किमी आहे. येथे आतापर्यंत केवळ तीन जणांनाच जाता आले आहे.
अटाकामा वाळवंट, चिली अटाकामा वाळवंट हे जगातील सर्वात सर्वात शुष्क ठिकाण आहे. या वाळवंटात काही अशी ठिकाणेही आहेत जिथे आतापर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही.
मौसिनराम, भारत भारतातील मौसिनराम हे जगातील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक आहे. येथे वर्षाकाठी सुमारे 11.86 मीटर पाऊस पडतो.