'स्टेट डिनर'ला दिग्गज भारतीयांची मांदियाळी, व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले अंबानी By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 04:54 PM 2023-06-23T16:54:12+5:30 2023-06-23T17:03:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली.
पत्रकार परिषदेपूर्वी अमेरिका आणि भारत यांच्यात अनेक महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यामध्ये, संरक्षणविषयक करार महत्त्वाचे मानले जातात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी स्टेट डिनरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निमंत्रित केलं होतं. त्यानुसार, व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनर पार्टीही झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या स्टेट डिनरसाठी देशातील दिग्गजांनी हजेरी लावली असून उद्योगपती मुकेश अंबानी हे आपल्या पत्नी निता अंबानी यांच्यासह या डिनर पार्टीसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत.
व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनमध्ये स्टेट डिनरसाठी जवळपास ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या लॉनला भारतीय थीमने सजवण्यात आले होते.
अंबानी यांच्यासह व्हाईट हाऊसमधील या स्टेट डिनर पार्टीसाठी पेप्सिको कंपनीची सीईओ इंदिरा नुई यांचाही समावेश आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा हेही अमेरिकेत या स्टेट डिनर पार्टीला उपस्थित होते.
दिग्गज स्टॉक ब्रोकिंग कंपनी Zerodha चे संस्थापक निखील कामथ हेही निमंत्रण पाहुण्याच्या यादीत होते. त्यांनीही पार्टीला हजेरी लावली होती.
जगप्रसिद्ध कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचई हेही पत्नी अंजलीसह व्हाईट हाऊसमधील मोदींसमवेतच्या पार्टीला उपस्थित होते.
एडोबचे सीईओ शंतणु नारायण, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नंडेला हेही कार्पोरेट विश्वातील दिग्गज म्हणून या डिनर पार्टीत सहभागी झाले होते.