रहस्यमय! रशियात सॅटेलाइट फोटोंमधून दिसल्या अनोख्या रेषा, NASA चे वैज्ञानिकही झाले हैराण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 10:53 IST2021-03-02T10:44:08+5:302021-03-02T10:53:52+5:30
Mysterious Stripes in Russia: रशियाच्या या भागात काही दिवसांसाठीच जमीन दिसते आणि वर्षातले ९० टक्के दिवस येथील जमीन बर्फाने झाकलेली असते.

रशियात अजब भूवैज्ञानिक रेषांमुळे नासाचे वैज्ञानिक हैराण झाले आहेत. सायबेरिया भागात मर्खा नदीच्या आजूबाजूला आकाशातून घेतलेल्या सॅटेलाइट फोटोंमध्ये या अनोख्या रेषा दिसत आहेत. या रेषा बघून वैज्ञानिक प्रश्नात पडले आहेत. या रेषांमागील कारण त्यांना समजलेलं नाही.
नासा द्वारे अनेक वर्षांपासून लॅंडसॅड ८ ने कॅप्चर केलेल्या या फोटोंमध्ये जमिनीवर वेगळाच आकाराच्या रेषा दिसत आहे. मर्खा नदीच्या दोन्ही बाजूने दाट आणि हलक्या दोन्ही प्रकारच्या रेषा दिसत आहेत.
या रहस्यमय रेषा सर्वच वातावरणात दिसून येतात. पण हिवाळ्यात बर्फामुळे या रेषा एकमेकांपासून वेगळ्या रहस्यमय रेषा स्पष्टपणे दिसत आहेत.
सायबेरियात दिसत असलेल्या या रेषांबाबत वैज्ञानिकांना निश्चितपणे काही माहीत नाही. पण त्यांना असं वाटतं की याचं रहस्य बर्फाशी संबंधित आहे.
रशियाच्या या भागात काही दिवसांसाठीच जमीन दिसते आणि वर्षातले ९० टक्के दिवस येथील जमीन बर्फाने झाकलेली असते.
काही वैज्ञानिकांचं मत आहे की, कधी बर्फाखाली दबल्याने आणि कधी बर्फ वितळल्याने जमीन वर आल्याने ही रहस्यमय डिझाइन तयार झाली आहे. या चक्रादरम्यान माती आणि दगड स्वाभाविकपणे स्वत:ला आकार देतात.
काही इतर वैज्ञानिकांचं मत आहे की, काही कोटी वर्षांआधी जमिनीत झालेल्या बदलांमुळे या रेषा पडल्या आहेत. अशाप्रकारच्या रेषा नार्वेमध्येही बघायला मिळतात. पण सायबेरियाच्या तुलनेत त्या फार लहान आहेत.
यूएस जिओलॉजिकल सर्वेनुसार, पॅटर्न माती आणि दगड यातील बदलांचा हा परिणाम होऊ असू शकतो. तर नासाचे वैज्ञानिक म्हणतात की, या रेषा त्यांच्यासाठी अजूनही रहस्य आहेत.
जेव्हा बर्फ वितळतो किंवा पाऊसाचं पाणी खालच्या दिशेने वाहतं तेव्हा डोंगरांवर या रेषा तयार होता. यूएस जिओलॉजिकल सर्वेच्या एका वैज्ञानिकांनी दावा केला की, गर्द रंगाच्या या रेषा उभ्या क्षेत्रांना दाखवतात. तर हलक्या रेषा सपाट क्षेत्र दाखवतात.