परदेशातील रस्त्यांना देण्यात आली आहेत या प्रसिद्ध भारतीयांची नावे By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 11:48 PM 2019-12-14T23:48:56+5:30 2019-12-15T00:29:14+5:30
भारतातील अनेक व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेला आहे. त्यामुळेच या भारतीयांचा परदेशातही सन्मान करण्यात आला आहे. अशाच काही भारतीयांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची नावे परदेशातील रस्त्यांना देण्यात आली आहेत.
राज कपूर क्रेसेंट, ब्रेमप्टन, कॅनडा अभिनेते राज कपूर यांचे नाव कॅनडामध्ये एका रस्त्याला देण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद वे, शिकागो, अमेरिका स्वामी विवेकानंद यांचे नाव अमेरिकेतील शिकागो शहरातील एका रस्त्याला देण्यात आलेले आहे.
रवींद्रनाथ टागोर स्ट्रीट, बर्लिन, जर्मन जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे नाव एका रस्त्याला देण्यात आले आहे.
महात्मा गांधी स्ट्रीट (अनेक देशात) महात्मा गांधींचे नाव भारताप्रमाणेच अनेक देशातील रस्त्यांना देण्यात आले आहे.
भगत सिंह चौक, लाहोर, पाकिस्तान शहीद भगत सिंह यांना लाहोर येथे फाशी देण्यात आली होती. लाहोरमध्ये एका चौकाला भगत सिंह यांचे नाव देण्यात आले आहे.
जवाहरलाल नेहरू स्क्वेअर, मॉस्को, रशिया रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये एका चौकाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे.
इंदिरा गांधी स्ट्रीट, टंझानिया टंझानियामध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आलेले आहे.
गावस्कर प्लेस, वेलिंग्टन, न्यूझीलंड महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे नाव न्यूझीलंडमधील एका ठिकाणाला देण्यात आले आहे.
ए. आर. रेहमान स्ट्रीट, ओनटारिओ, कॅनडा संगीतकार ए. आर. रेहमान यांचे नाव कॅनडामधील एका रस्त्याला देण्यात आले आहे.