nasa Astronaut Christina Koch watches sunrise 16 times in single day
'ती' दररोज 16 वेळा पाहते सूर्योदय; पण कसा? By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 03:49 PM2020-01-10T15:49:04+5:302020-01-10T15:53:19+5:30Join usJoin usNext अमेरिकेची अंतराळ संस्था नासामध्ये कार्यरत असणाऱ्या क्रिस्टिना कोच यांच्या नावावर सर्वाधिक दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे. पृथ्वीपासून ४०८ किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रिस्टिना दिवसातून १६ वेळा सूर्योदय पाहतात. स्पेस स्टेशन सतत पृथ्वीभोवती फिरत असल्यानं जवळपास दर ९० मिनिटांनी त्यांना सूर्योदय दिसतो. ऑक्टोबर २०१९ मध्ये क्रिस्टिना यांनी स्पेसवॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत दुसऱ्या अंतराळवीर जेसिका मीर होत्या. कोणत्याही पुरुष अंतराळवीर सहकाऱ्याविना महिलांनी केलेला हा पहिला स्पेसवॉक ठरला. अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव करणारी महिला अंतराळवीर होण्याचा मानदेखील लवकरच क्रिस्टिना यांना मिळणार आहे. २०१७ मध्ये नासाच्या पेगी व्हिटसन अंतराळात २८९ दिवस ५ तास १ मिनिटं वास्तव्य करुन परतल्या. क्रिस्टिना फेब्रुवारीत पृथ्वीवर येतील. त्यावेळी त्यांनी अंतराळात ३२८ दिवस वास्तव्य केलेलं असेल. क्रिस्टिना १४ मार्च २०१९ रोजी अंतराळात गेल्या. त्यांची मोहीम ६ महिन्यांची होती. मात्र या मोहिमेचा कालावधी वाढवण्यात आला. अंतराळात इतके दिवस वास्तव्य करण्याची संधी मिळणं हा आपला सन्मान असल्याचं क्रिस्टिना म्हणतात. क्रिस्टिना ६ फेब्रुवारी २०२० रोजी पृथ्वीवर परततील. तोपर्यंत त्या अनेकदा स्पेसवॉक करतील. स्पेस स्टेशनमध्ये मोकळ्या वेळेत क्रिस्टिना अंतराळ आणि पृथ्वीचे फोटो काढतात. ४० वर्षांच्या क्रिस्टिना यांची २०१३ मध्ये नासात निवड झाली. टॅग्स :नासाNASA