NASA has released a report on Unidentified Anomalous Phenomena - commonly known as UFOs
पृथ्वीच्या बाहेर UFO चा धोका; अंतराळातील रहस्य एलियनवर NASA चा मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:42 AM2023-09-15T11:42:14+5:302023-09-15T11:49:31+5:30Join usJoin usNext अमेरिकन अंतराळ संस्था नासानं गुरुवारी यूएफओ (Unidentified Flying Object) वर बहुप्रतिक्षित रिपोर्ट जारी केला. १ वर्ष यावर अभ्यास सुरू होता त्यानंतर हा रिपोर्ट समोर आणला आहे. ज्याच्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. ३३ पानी या रिपोर्टमध्ये नासाकडून यूएफओमागे एलियन्स आहे की नाही याचे पुरावे दिले नाहीत. परंतु त्याबाबतची शक्यताही नाकारली नाही. नासानं म्हटलं की, या विषयावर आणखी विस्ताराने अभ्यासासाठी नवीन वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि आधुनिक सॅटेलाईट्सची गरज आहे. यूएफओ आपल्या अवकाशातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. या ब्रह्मांडात पृथ्वीशिवाय अन्य कोणत्या ग्रहावरही जीवन आहे असं नासा प्रमुख बिल नेल्सन यांनी मान्य केले. त्याचसोबत हे संपूर्ण तथ्य तपासण्यासाठी यूएपी रिसर्च डायरेक्टरची नियुक्ती करत आहोत. ही नियुक्ती स्वतंत्र्य रिसर्च टीमच्या शिफारशीवरून करण्यात येत आहे. यूएफओची उच्च गुणवत्तेशी निगडीत चर्चा आणि मर्यादित संख्येमुळे त्यांच्या जीवनशैलीबद्दल वैज्ञानिक निष्कर्ष काढणे कठीण आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे यूएफओ संशोधनासाठी स्वतंत्र्य रिसर्च टीम, विविध क्षेत्रातील १६ सामुहिक तज्ज्ञांचा समावेश असेल. नासा रिपोर्टममध्ये यूएफओ अमेरिकी हवाई क्षेत्रासाठी धोका असल्याचे म्हटलं आहे. UFO संशोधन एक विलक्षण वैज्ञानिक संधी निर्माण करते. ही संधी एक पद्धतशीर निरिक्षण रिपोर्ट तसेच ठोस पुरावा-आधारित दृष्टिकोन तयार करते. नासा एक नवीन मिशन बनवायला जात आहे. ज्यात ते ग्रहाच्या वातावरण आणि पृष्ठभागावर एलियन तत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. पृथ्वीचे निरिक्षण करणाऱ्या सॅटेलाईट्समध्ये स्पेटियल रिझोल्यूशनची कमतरता असते त्यामुळे UFO अथवा UAP सारख्या लहान ऑब्जेक्ट्सवर नजर ठेवता येत नाही. पेंटागॉनने यापूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता ज्यामध्ये नौदलाच्या वैमानिकांनी अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर काही रहस्यमय विमाने पाहिली होती. या विमानांचा वेग सध्याच्या विमान वाहतूक तंत्रज्ञानापेक्षा जास्त होता आणि विमानाची रचनाही अनाकलनीय होती त्यामुळे उड्डाण कुठून नियंत्रित केले जात आहे हे कळू शकले नाही. नासाने सांगितले की, एआय आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने यूएफओचा अभ्यास केला जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला, NASA च्या टीमने आग्रहीपणे म्हटलं होतं की, यूएफओशी संबंधित बाह्य जीवनाचा कोणताही निर्णायक पुरावा नाही, परंतु आता ताज्या रिपोर्टमध्ये, NASA ने मान्य केले आहे की आपल्या ग्रहाबाहेर जीवन असू शकते. नासाने सांगितले की, अद्याप पुरेसा डेटा नाही, त्यामुळे यूएफओबाबत कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एजन्सीने एक स्वतंत्र अभ्यास सुरू केला आहे. यात,आकाशात घडणाऱ्या घटनांचे संशोधन पुढे नेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये ते कसे योगदान देऊ शकते याचा शोध घेतला जाईल. या अशा घटना आहेत ज्यांना फुगे, विमान किंवा ज्ञात नैसर्गिक घटना म्हणून ओळखले जाऊ शकत नाही आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक आहे. 'नासामध्ये, गोष्टी तशा का आहेत हे शोधणे आणि विचारणे आपल्या डीएनएमध्ये आहे, असंही नेल्सन यांनी सांगितले. NASA भविष्यात UFO चा अधिक चांगला अभ्यास आणि विश्लेषण कसे करू शकेल? हे रिपोर्टच्या शेवटच्या पानावर दिले आहे. नासाने नोंदवलेल्या शेकडो यूएफओच्या मागे कोणतीही अलौकिक शक्ती आहे असा निष्कर्ष काढण्याचे कारण नाही. सूर्यमालेतून रहस्यमय गोष्ट इथपर्यंत पोहोचल्याचे अहवालात म्हटले आहे. टॅग्स :नासापृथ्वीNASAEarth