ना कॅमेऱ्यात दिसणार, ना दुर्बीण पकडणार, या तंत्राने सैनिक क्षणार्धात गायब होणार By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:51 PM 2021-06-30T17:51:35+5:30 2021-06-30T17:58:57+5:30
शत्रूच्या क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी चकवा देणाऱ्या नेटला खूप महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मात्र इस्राइल आता एक असे नेट घेऊन आले आहे जे सैनिकांना पूर्णपणे अदृश्य करू शकते. जगभरात खतरनाक मिशन पूर्ण करण्यासाठी प्रत्येक देशात आपापल्या स्तरावर तयारी केली जाते. यामध्ये शत्रूच्या क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी चकवा देणाऱ्या नेटला खूप महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मात्र इस्राइल आता एक असे नेट घेऊन आले आहे जे सैनिकांना पूर्णपणे अदृश्य करू शकते.
इस्राइलची कंपनी पोलारिस सॉल्युशन्स अशा प्रॉडक्ट्सची निर्मिती करते. हे प्रॉडक्ट युद्धादरम्यान बचावासाठी उपयुक्त ठरू शकतात. या कंपनीने इस्राइल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससोबत मिळून किट ३०० शीट नावाचे हे प्रॉडक्ट तयार केले जाते.
हा एक थर्मल व्हिज्युएल कंसिलमेंट (टीव्हीसी) पासून बनलेला पदार्थ आहे. ज्यामध्ये मायक्रोफायबर्स, मेटल आणि पॉलिमरचा वापर केला जातो. या प्रॉडक्टचा वापर केल्यावर मानवी नजरांनाच काय थर्मल कॅमेऱ्यातूनही कुणाला पाहणे खूप कठीण होते.
या शीटचे वजन केवळ ५०० ग्रॅम आहे, तसेच वजन कमी असल्यामुळे सैनिक याचा सहजपणे वापर करू शकतात. तसेच धोकादायक भागात ट्रेकिंगदरम्यानसुद्धा त्याला नेता येऊ शकते. सैनिक हे किट आपल्या शरीरावर परिधान करू शकतात. त्यामुळे कुणी माणून नाही तर दगड ठेवला आहे असे वाटू शकते.
इस्राइलच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये डिटेक्टर्स अँड इमेजिंग टेक्नॉलॉजीच्या हेड गेल हरारी यांनी सांगितले की, जर कुणी बायनाक्युलर्सच्या मदतीने लांबून ही शीट परिधान करून कुठल्याही सैनिकाला पाहिले तरी त्याला पाहणे कठीण असेल. हे किट वॉटरप्रुफ आहे. तसेच आपातकालीन परिस्थितीत त्याचे रूपांतर छोट्याशा टेंटमध्ये करता येऊ शकते.
पोलारिस सॉल्युशन्सच्या संचालकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, या नेट्समध्ये गेल्या ५० वर्षांमध्ये कुठलाही खास बदल झालेला नाही. आम्ही यात बदल करू इच्छित होतो. त्यामुळेच आम्ही यावेळी एका नव्या प्रकारच्या मटेरियलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
किट ३०० च्या एका भागाचा वापर हा सैनिक हिरव्यागार जंगलात असताना करता येऊ शकतो. तर दुसऱ्या भागाचा वापर वाळवंटी भागात करता येऊ शकतो. याशिवाय त्याचा स्ट्रेचरसारखा वापर करून जखमी सैनिकांची ने आण करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
ही कीट बनवण्याची प्रेरणा इस्राइलच्या एका स्पेशन डिफेंस फोर्स युनिटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मिळाली होती. सन २०१६ मध्ये लेबनान वॉरच्या दरम्यान, त्यांना थर्मल कॅमेरा आणि नाइट व्हिजन कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी काहीतरी तंत्र विकसित करण्याची गरज भासली होती.