संकटाची चाहूल! चीनच्या वुहान लॅबमध्ये कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक व्हायरस, जेनेटिक डेटामधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 05:29 PM 2021-04-10T17:29:59+5:30 2021-04-10T17:44:12+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा कहर सुरू असून अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झपाट्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असं म्हटलं जातं. कोरोनाचा कहर सुरू असून अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
संशोधकांच्या एका टीमने चीनच्या वुहानमध्ये सध्याच्या कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक असे विविध प्रकारचे नवीन कोरोना व्हायरस आहेत असा दावा केला आहे. चीनच्या अन्य शहरातील कृषि प्रयोगशाळेतील तांदूळ आणि कापूस यांच्या जेनेटिक डेटाच्या आधारावर ही बाब समोर आली आहे.
कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यामुळे चीन पुन्हा एकदा जगासमोर आणखी एक संकट निर्माण करू शकतं. हा व्हायरस जास्त धोकादायक असू शकतो.
कृषि प्रयोगशाळेत मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये किंवा वायरोलॉजी लॅब प्रमाणे मजबूत सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा व्हायरस अधिक खतरनाक असल्याचं म्हटलं जात आहे. हा रिसर्च ArXiv नावाच्या प्रीप्रिंट सर्वरमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या वुहान आणि अन्य शहरातील कृषि प्रयोगशाळेत (Agricultural Labs) मध्ये व्यक्तींना नुकसान पोहोचवणारे अनेक धोकादायक व्हायरस उपलब्ध आहेत. जर याला सुरक्षितपणे कंट्रोल केले गेले नाही तर संपूर्ण जगासमोर समस्या निर्माण करू शकतात.
सर्व जेनेटिक डेटा वुहान इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (Wuhan Institute of Virology) मध्ये काढले होते. यावरून आता जगभरात संशयाचे वातावरण आहे. या लॅबमधून कोरोना व्हायरस ही महामारी चुकून पसरली आहे.
चीनने मात्र नेहमीच कोरोना व्हायरस पसरण्यासाठी आपण कारणीभूत असल्याचं नाकारलं आहे. मात्र जगभरातील शास्त्रज्ञांना या लॅबवर संशय आहे. आता पुन्हा एकदा चीनमधूनच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 13 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.