चीनमध्ये नववर्षाचा झगमगाट; लाल रंगात रंगला देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 21:31 IST2019-02-05T21:22:57+5:302019-02-05T21:31:30+5:30

चीनमध्ये लुनार नववर्षाची सुरुवात मंगळवारपासून झाली. भारतातील हिंदू नववर्ष जसे साजरे होते तसेच चीनमध्ये हे वर्ष साजरे केले जाते. हा महोत्सव चीनसह अन्य देशांमध्येही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
लाल रंगातील कंदिल दिव्यांनी बाजार सजला असून पुढील 15 दिवस हा उत्सव चालणार आहे. या उत्सवाला लाल कंदील उत्सव असेही म्हटले जाते.
चीनी राशी चक्रानुसार या वर्षाचे वाहन डुक्कर असणार आहे. तर पुढील वर्षाचे वाहन कुत्रा असणार आहे.
लाल कंदिलांच्या उत्सवावेळी मंदिरांमध्ये कंदील लटकवले जातात.
रॅलीवेळीही कंदील आणले जातात. या रॅलीवेळी ड्रॅगन डान्स मुख्य आकर्षण असते.
चीनसह थायलंडमध्येही हे नववर्ष साजरे केले जाते. थायलँडच्या किंग पावर बिल्डिंगवरच्या काचेवर कलाकारांनी कलाकृती सादर केल्या.
चीनी नववर्षाला एकमेकांना शुभ म्हणून पैसे दिले जातात.
नव्या वर्षात नागरिक मंदिरांमध्ये जाऊन प्रार्थना करतात. चीनी देवतांची पूजा केली जाते.
तैवानमध्ये धर्मा ड्रम माउंटेन मध्ये बौद्ध मठामध्ये मोठा घंटानाद करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते.