no oil, gas reserves discovered in Karachi coast, bad news for Pakistan
700 करोड खर्च करुन पाकिस्तानला मिळाला 'ठेंगा' By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 03:18 PM2019-05-20T15:18:38+5:302019-05-20T15:23:02+5:30Join usJoin usNext आर्थिक संकटाशी तोंड देत असलेल्या पाकिस्तानला अरबी समुद्रात तेलाचा साठा न मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन बहुराष्ट्रीय तेल आणि गॅस कंपनी सध्या पाकिस्तानच्या कराची येथील समुद्र किनाऱ्यावर 5 हजार मीटर खोदकाम करत होती. त्याठिकाणी तेलाचा साठा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पाकिस्तानने वर्तवलेली ही शक्यता मावळली असून अनेक स्वप्न पाहत सुरु केलेलं हे खोदकाम अयशस्वी झाल्याने पाकिस्तानची निराशा झाली आहे. आर्थिक डबघाईला तोंड देत असलेल्या पाकिस्ताने हे खोदकाम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तेलाचा साठा मिळाल्याने अच्छे दिन येण्याची आस पाकिस्तानला लागली होती. पाकिस्तान सरकारचे मंत्री अब्दुला हुसैन हरुन यांनी पाकिस्तान-इराण सीमेवर अमेरिकन कंपनी एक्सॉनमोबिल यांच्या मोठ्या प्रमाणात तेलसाठा शोधण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितले होते. आधीच तीन आठवडे खोदकाम करण्यास अडचणी निर्माण झाल्याने याला विलंब झाला होता. मिळालेल्या संकेतानुसार पाकिस्तान हद्दीतील समुद्रामध्ये आशियातील सर्वात मोठा तेलसाठा असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे जर असं झालं असतं तर पाकिस्तानची आर्थिक गणिते पूर्णपणे बदलली गेली असती मात्र आता ती शक्यता मावळली आहे. जर पाकिस्तानला हा तेलसाठा मिळाला तर पाकिस्तान तेल उत्पादकाच्या 10 सूची असलेल्या यादीत समाविष्ट झाला असता. कुवैत सारख्या देशालाही पाकिस्तान मागे टाकलं असतं. जगभरातील एकूण तेलसाठ्यापैकी 8.4 टक्के तेल साठ्याचा कुवैत मालक आहे.टॅग्स :पाकिस्तानतेल शुद्धिकरण प्रकल्पPakistanOil refinery