north korea election voting is mandatory but there is no choice of candidates excepting kim jong un
'या' देशात फक्त दिखाव्यासाठी घेतली जाते निवडणूक... By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:41 PM2019-03-12T18:41:04+5:302019-03-12T18:47:25+5:30Join usJoin usNext भारतात लोकसभा निवडणुका येत्या एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. एकूण सात टप्प्यात या निवडणुका पार पडणार असून याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. या निकालानंतर कोणते सरकार देशातील सत्तेवर विराजमान होणार हे समजणार आहे. दरम्यान, अशा एका देशाबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहेत की, त्या देशामध्ये फक्त दिखाव्यासाठी मतदान केले जाते, कारण तेथील सरकार आधीच ठरवले असते. उत्तर कोरिया, असे या देशाचे नाव आहे. या देशातील निवडणूक जगातील वेगळी निवडणूक म्हणून ओळखली जाते. दर पाच वर्षांनी याठिकाणी 'सुप्रीम पीपल्स असेंबली'साठी निवडणूक घेतली जाते. मात्र, मतदानावेळी प्रत्येक मतपत्रिकेवर फक्त एकाच उमेदवाराचे नाव असते. ते नाव म्हणजे, किम जोंग उन. किम जोंग उन यांना जगभरात उत्तर कोरियाचा हुकुमशाह म्हणून ओळखले जाते. असे सांगण्यात येते की, किम जोंग उन यांच्या परवानगीशिवाय येथील कोणतेही काम होऊ शकत नाही. त्यांनी एखादा कायदा केला, तर तो कायदा तोडण्याचा किंवा त्याविरोधात जाण्याचं धाडस कोणीही करु शकत नाही. उत्तर कोरियामध्ये 'सुप्रीम पीपल्स असेंबली' च्या निवडणुकीसाठी 10 मार्चला मतदान करण्यात आले. या निवडणुकीचा निकाल आधीच जाहीर झाल्याचे सांगण्यात येते. येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'उत्तर कोरियामध्ये निवडणुकीत भाग घेण्याचे नागरिकांचे कर्तव्य आहे. असा कोणताही व्यक्ती नाही की उमेदवाराला नकार देऊ शकेल.' येथील मतदारांना मतदान करताना फक्त 'हो' किंवा 'नाही' असे लिहावे लागते. उमेदवारांच्या अंतिम सूचीवरुन कळते की देशाच्या नेतृत्वासोबत कोण आहे आणि कोण नाही. गेल्या निवडणुकीत 99.97 टक्के मतदान झाले होते. उत्तर कोरियामध्ये विशेष बाब म्हणजे वर्षात एकदा किंवा दोनदा संसदेची बैठक होते. यावेळी देशाचे बजेट किंवा देशाच्या सुरक्षतेशी संबंधित निर्णय घ्यायचा असेल तर बैठक घेतली जाते.टॅग्स :उत्तर कोरियानिवडणूकnorth koreaElection