North korea executes 5 officials who criticised kim jong policies
उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंग भडकला; 5 अधिकाऱ्यांना गोळी घालण्याचा दिला आदेश By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 10:34 PM2020-09-12T22:34:18+5:302020-09-12T22:47:03+5:30Join usJoin usNext उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले म्हणून किमने आपल्या पाच अधिकाऱ्यांना मृत्यू दंड दिला आहे. हुकूमशहा किमच्या आदेशावरून या अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. दक्षीण कोरियाच्या डेली एनके या साईटनुसार, उत्तर कोरीयाच्या आर्थ मंत्रालयातील या पाचही अधिकाऱ्यांनी एका डिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा केली होती. यावेळी या अधिकाऱ्यांनी किमच्या धोरणावरही टीका केली होती. या चर्चेवेळी त्यांनी देशात औद्योगिक सुधारणेची आश्यकता असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही, तर उत्तर कोरियाने आपल्यावरील बंधने दूर करण्यासाठी परराष्ट्रीय मदत घ्यायला हवी, असे मतही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. दक्षीण कोरियातील साईटनुसार, या चर्चेसंदर्भात किम जोंग उनकडे तक्रार करण्यात आली होती. किम आर्थ मंत्रालयाचाही प्रमुख आहे. किमकडे तक्रार गेल्यानंतर, या सर्वांना बोलावण्यात आले. यानंतर, उत्तर कोरीयाची शासन व्यवस्था त्यांनी कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचे दबाव टाकून त्यांच्याकडून कबूल करून घेण्यात आले. यानंतर 30 जुलैला त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या सर्वांच्या कुटुंबीयांना आता येडोक येथील एका पॉलिटिकल कॅम्पमध्ये पाठवण्यात आले आहे. सध्या नॉर्थ कोरियाची आर्थीक स्थिती अत्यंत वाईट आहे. तसेच कोरोना व्हायरस महामारीमुळेही देशाच्या परिस्थितीहीवर वाईट परिणाम झाला आहे. उत्तर कोरियाची गणना जगातील सर्वात गरीब देशांत केली जाते. उत्तर कोरियावर अजूनही अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध आहेत. काही दिवसांपूर्वी एक वृत्त आले होते, की किम जोंग उनने फायरिंग स्क्वॅडच्या सहाय्याने आपल्या काकांची हत्या केली होती. किम जोंग उनने कोरोनाला आळा घालण्यासाठी चीनवरून येणाऱ्या लोकांना गोळी घालण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियात तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यातील कमांडरने नुकतीच दिली होती. उत्तर कोरियातील कमकुवत आरोग्य सवा, कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरत आहे. कोरोना पसरल्यापासून अद्यापही किमने देशातील एकाही कोरोना रुग्णाची पुष्टी केलेली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उत्तर कोरीयाने चीनला लागून असलेली सीमा जानेवारी महिन्यातच बंद केली होती.टॅग्स :किम जोंग उनउत्तर कोरियाअर्थव्यवस्थाKim Jong Unnorth koreaEconomy