North Korea rebuilt the atomic bomb, Kim Jong Un became even more powerful during the Corona Crisis
उत्तर कोरियाने पुन्हा बनवला अणुबॉम्ब, कोरोना संकट काळात किम जोंग बनले आणखी शक्तिशाली By ravalnath.patil | Published: September 30, 2020 04:40 PM2020-09-30T16:40:38+5:302020-09-30T16:54:50+5:30Join usJoin usNext संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात असे समोर आले आहे की, कोरोना संकट काळात सुद्धा उत्तर कोरिया अत्यंत वेगाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रोग्रॉमवर काम करत आहे. अहवालानुसार, उत्तर कोरियाने आणखी एक अणुबॉम्ब तयार केला आहे. तसेच, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच उत्तर कोरिया नवीन क्षेपणास्त्रे बनविण्यावर सातत्याने काम करत असल्याचे वृत्त आहे. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्राच्या नवीन रिपोर्टवरून असे सूचित होते की, उत्तर कोरियावर लादलेले सर्व निर्बंध निष्पन्न झाले आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आपले मिशन झपाट्याने पूर्ण करीत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने नियुक्त केलेल्या देखरेखीच्या तज्ज्ञांनी एक नवीन रिपोर्ट तयार केला आहे. तज्ज्ञांच्या मते, बंदी असूनही किम जोंग उन यांचे सरकार बंदी घातलेल्या वस्तू खरेदी-विक्री करण्यात यशस्वी ठरले आहे. यासाठी उत्तर कोरियाने नवीन मार्ग शोधले आहेत. मंगळवारी उत्तर कोरियाची सरकारी संस्था केसीएनएने किम जोंग उन यांचे नवीन फोटो प्रसिद्ध केले होते आणि त्यांना वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या बैठकीत भाग घेताना दाखविले होते. टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, असे समजले जात आहे की, उत्तर कोरियाने लहान आकाराचा अणुबॉम्ब बनवून मोठे यश संपादन केले आहे, कारण त्याला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रावर बसविले जाऊ शकते. यापूर्वी 2017 मध्ये उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. जी अमेरिकेला हादरा देण्यास सक्षम आहे. उत्तर कोरिया 2006 पासून संयुक्त राष्ट्रांच्या बंदीचा सामना करत आहे. अणुबॉम्ब आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रोग्रॉम सुरू केल्यामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी 2018 पासून तीन वेळा भेट घेतली असली तरी उत्तर कोरियाने आण्विक शस्त्रे सोडण्यास सहमती दर्शविली नाही.टॅग्स :उत्तर कोरियाकिम जोंग उनnorth koreaKim Jong Un