रशिया-युक्रेन नव्हे, 2023 मध्ये या कारणामुळं पेटणार तिसरं महायुद्ध! नव्या 'नॉस्ट्रॅडॅमस'ची धडकी भरवणारी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 04:32 PM2023-03-01T16:32:54+5:302023-03-01T16:39:46+5:30

"या युद्धात चीन कमकुवत होऊन त्याचे तुकडे होतील. एक मोठा चीन नष्ट होईल आणि नव्या चीनचा जन्म होईल....!"

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासूनच, आपण तिसऱ्या महायुद्धकडे चाललो आहोत का? रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे, आपल्याला आणखी एक मोठे संकट पाहावे लागणार आहे का? जगाची समिकरणे पुन्हा एकदा बदलणार का? अशी चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहे. ही चर्चा सुरू होण्या मागचे कारण म्हणजे, प्रसिद्ध भविष्यवक्ते नॉस्ट्रॅडॅमस यांनी शेकडो वर्षांपूर्वीच, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होणार असल्याची केलेली भविष्यवाणी. आता त्यांच भविष्यवाणीला नवे नॉस्ट्रॅडॅमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन यांनी दुजोरा दिला आहे.

एका प्लेन क्रॅशने सुरू होणार तिसरे महायुद्ध - लोक आजही नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाण्यांसंदर्भात बोलत असतात. क्रेग हॅमिल्टन यांना नवा नॉस्ट्रॅडॅमस, असे म्हटले जाते. त्यांनी, एका विमान अपघातामुळे तिसऱ्या महायुद्धाला सुरूवात होईल, असे धक्कादायक भाकीत केले आहे.

हे युद्ध चीन आणि तैवान मुद्द्यावर होईल. याचे परिणाम अत्यंत धक्कादायक असतील, असेही क्रेग यांनी म्हटले आहे. यापूर्वी जगाने 1914 ते 1919 या काळात पहिले महायुद्ध पाहिले आहे. तर 1936 ते 1945 दरम्यान दुसरे महायुद्ध पाहिले आहे.

कसं निर्माण होणार जगातील सर्वात मोठं संकट - 'डेली स्टार'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एक वृत्तानुसार, क्रेग हॅमिल्टन यांनी तैवानमध्ये एका भीषण विमान अपघाताची भविष्यवाणी केली आहे. यामुळे लवकरच तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते.

नव्या नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीनुसार, दोन पाणबुड्या अथवा दोन विमानांमध्ये टक्कर होईल. याच संभाषणात क्रेग म्हणाले, यामुळे एका मोठ्या संघर्षाला सुरुवात होईल आणि थोड्याच वर्षांत ही स्थिती जगातील गंभीर संकट बनेल.

काय होईल युद्धाचा परिणाम? - क्रेग म्हणाले, हे युद्ध एवढे मोठे असेल की, युक्रेन युद्धही आपल्याला फार छोटो भासेल. कारण चीनने तैवानवर हल्ला केला, तर या युद्धात अमेरिकेची एन्ट्री होईल. अशात, रशिया चीनची बाजू घेऊ शकतो. यामुळे परिस्थिती आणखीनच भयावह बनेल.'

चीनचे तुकडे होतील! नव्या नॉस्ट्रॅडॅमसने या युद्धाचा एक धक्कादायक परिणाम सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे, 'असे युद्ध झाल्यास, चीनचे कमकुवत होऊन तुकडे होतील. एक मोठा चीन नष्ट होईल आणि नव्या चीनचा जन्म होईल.'

...म्हणून नव्या नॉस्ट्रॅडॅमसवर विश्वास ठेवत आहेत लोक? - क्रेग हॅमिल्टन यांनी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयच्या निधनाची अगदी अचूक भविष्यवाणी केली होती. यापूर्वी फ्रान्सच्या नॅस्ट्रॉडॅमसनेही 2023 मध्ये महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे.