आता रोमान्ससाठी 10 दिवसांची 'फुलपगारी रजा', देशासाठी हवंय योगदान By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:24 PM 2021-08-17T17:24:01+5:30 2021-08-17T17:36:53+5:30
कंपनीत काम करत असताना काही कामानिमित्त किंवा आजारपणासाठी सुट्ट्या घेता येतात. विशेष म्हणजे कंपनीकडून या सुट्ट्या फुलपगारीही दिल्या जातात.
सण, आजारपण आणि प्रेग्नन्सीच्या कालावधीतही खास सुट्ट्या असतात हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण रोमान्ससाठी सुट्टी (Fertility leave) कधी ऐकली आहे का?
जपान सरकारने चक्क रोमान्ससाठी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार, 10 दिवसांची सुट्टी घेऊन आता कर्मचाऱ्यांना आपल्या जोडीदारासोबत रोमान्स करता येणार आहे.
जपान सरकारने तरुण जोडप्यांसाठी एक विशेष योजना लागू केली आहे. ज्यामध्ये फक्त रोमान्स करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तब्बल 10 दिवसांची ही फर्टिलिटी लिव्ह (10 days fertility leave) असेल.
विशेष म्हणजे या सुट्टीचा पगार कापला जाणार नाही. म्हणजे ही पेड लिव्ह म्हणजेच फुलपगारी सुट्टी असणार आहे.
या सुट्टीचं उद्दिष्ट म्हणजे जपानची लोकसंख्या वाढवणं हे आहे. जपानची लोकसंख्या घटली आहे. 1950-1971 सालापर्यंत जपान जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 10 देशांमध्ये होता.
आता इथं जन्मदर खूप घटला आहे. येथील लोकसंख्या 126 दशलक्षपेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळेच सरकारला असं पाऊल उचवावं लागलं. येथील तरुणाईला रोमान्स करण्याचंच एकप्रकारे जपानने सुट्टी देऊन सूचवलं आहे.
आतापर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्याला असलेल्या सुट्ट्यांमधूनच फर्टिलिटी लिव्ह घ्यावी लागत होती. पण आता विशेष फर्टिलिटी लिव्हची सुविधा देण्यात आली आहे.
लोक सुट्टी घेऊन घरी राहून रोमान्स करतील आणि जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतील. देशाच्या लोकसंख्या वाढीत त्यांचं योगदान असणार आहे, म्हणून त्यांच्या या सुट्ट्यांचा पगार कापला जाणार नाही.
जपानच्या नॅशनल पर्सोनल अथॉरिटीचे अध्यक्ष युको कावामोटो यांनी सांगितलं, काम आणि मुलं जन्माला घालणं दोन्ही एकत्र नाही करू शकतं, असं सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
सरकारने म्हणूनच कर्मचाऱ्यांना सूट दिली आहे. आता वर्षभऱात 10 दिवसांची पेड लिव्ह फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी दिली जाईल.