Nurse tests positive for COVID 19 shortly after getting vaccinated
CoronaVirus News: चिंतेत भर! कोरोनाची लस घेतल्यानंतर सहा दिवसांत नर्सला कोरोनाची लागण By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 12:59 PM2020-12-30T12:59:56+5:302020-12-30T13:04:26+5:30Join usJoin usNext जगातील कोरोनाचा कहर सुरूच आहे. जगभरातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ८ कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या १८ लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा २ कोटींच्या जवळ गेला आहे. कोरोनानं आतापर्यंत जवळपास साडे तीन लाख अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेनं लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेगानं लसीकरण सुरू आहे. एकीकडे लसीकरणानं वेग घेतला असताना अमेरिकेच्या सॅन डियागोमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. कोरोनावरील लस घेतलेली नर्स सहा दिवसांनंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, सॅन डियागोमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय मॅथ्यू डब्ल्यू. यांना १८ डिसेंबरला फायझरची कोरोनावरील लस देण्यात आली. कोरोनाची लस टोचण्यात आल्यानंतर मॅथ्यू यांना साईड इफेक्ट जाणवू लागले. त्यांच्या हाताला वेदना होऊ लागल्या. सहा दिवसांनंतर लक्षणं जाणवू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनावरील लस दिल्यानंतर पुढील काही दिवसांत कोरोनाची लागण होण्याची घटना धक्कादायक किंवा आश्चर्यजनक नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. कोरोनावरील लस घेतल्यानंतर १० ते १४ दिवसांनंतरच व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होत असल्याची माहिती संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ असलेल्या क्रिस्टियन रॅमर्स यांनी दिली. लस टोचण्यात आल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी दीड ते दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोजदेखील घ्यावा लागतो, असं क्रिस्टियन रॅमर्स यांनी सांगितलं. संबंधित नर्स कोरोनाची लस देण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह असावी. मात्र तिच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं नसावीत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची लक्षणं दिसण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागतो.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus