बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:37 PM 2020-07-03T13:37:26+5:30 2020-07-03T13:44:26+5:30
2 जुलै म्हणजेच गुरुवारी या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गर्दी केली होती. या हॉटेलच्या भिंती आणि शॉवरही गोल्ड प्लेटेड आहेत. या ठिकाणी लोक त्यांचे फोटो काढताना दिसून आले. जगातील पहिले सोन्याचे हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये खुले झाले आहे. येथे दरवाजे, कप, टेबल, खिडक्या, नळ, वॉशरुम, भांडी आदी सारेच सोन्याचे आहे. 2 जुलै म्हणजेच गुरुवारी या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.
या हॉटेलचे नाव डोल्से हनोई गोल्डन लेक (Dolce Hanoi Golden Lake) असे आहे. या हॉटेलचे गेट ते कॉफीच्या कपापर्यंत साऱ्या वस्तू सोन्याच्या बनविण्यात आल्या आहेत.
हे एक पंचतारांकित हॉटेल असून 25 मजल्याचे आहे. या हॉटेलमध्ये 400 खोल्या आहेत. हॉटेलच्या बाहेरील भिंतींवर जवळपास 54 हजार वर्ग फुटांच्या गोल्ड प्लेटेड टाईल्स लावण्यात आल्या आहेत.
हॉटेलच्या स्टाफचा ड्रेसकोड हा लाल आणि गोल्डन रंगाचा ठेवण्यात आला आहे. लॉबीमध्ये फर्निचर आणि सज्जाही सोन्याच्या कलाकृतीमध्ये केलेला आहे. कारण सारे हॉटेल गोल्डन असल्याचे दिसेल.
वॉशरुममधील बाथटब, सिंक, शॉवरसह सारे सोन्याचे आहे. बेडरुममधील फर्निचरलाही सोन्याचा पत्रा वापरलेला आहे.
हॉटेलच्या छतावरही इन्फिनिटी पूल बनविण्यात आले आहे. येथे हनोई शहराचे सुंदर दृष्य दिसते. छपराच्या भिंतीवरही सोन्याचा मुलामा असलेल्या विटा वापरण्यात आल्या आहेत.
पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गर्दी केली होती. या हॉटेलच्या भिंती आणि शॉवरही गोल्ड प्लेटेड आहेत. या ठिकाणी लोक त्यांचे फोटो काढताना दिसून आले.
या हॉटेलच्या निर्मितीला 2009 मध्ये सुरु झाले होते. हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर फ्लॅटही बनविण्यात आले आहेत. जर कोणाला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतो.
या हॉटेलला दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात लक्झरी हॉटेलचा मान देण्यात आला आहे. हे हॉटेल होआ बिन ग्रुप आणि विनधम ग्रुपने मिळून बनविले आहे. हे ग्रुप आणखी 2 सुपर 6 स्टार हॉटेल चालवितात.
सोने हे मानसिक तणावाला कमी करण्याचे काम करते. यामुळे हॉटेल प्रशासनाने जास्तीतजास्त सोन्याचा वापर केला आहे.
डबल बेडरुम सूटचे एका रात्रीचे भाडे 75 हजार रुपये असून हॉटेल रुम्सचे भाडे 20000 रुपयांपासून सुरु होते.
या हॉटेलमध्ये 6 प्रकारचे रुम आहेत. तसेच ६ प्रकारचे सूटही आहेत. प्रेसिंडेंशिअल सूटसाठी 4.85 लाख रुपये एवढे भाडे आकारले जाते.
या हॉटेलमध्ये गेमिंग क्लबही आहे जो 24 तास सुरु असणार आहे. येथे कसिनो आणि पोकरसारखे गेमही आहेत. जिंकल्यानंतर पैसेही वसूल होऊ शकतात.