Omicron Variant : ओमायक्रॉनच्या उपचारासाठी कोणती औषधं घ्यावीत अन् कोणती वापरू नये? WHO ने दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:25 PM 2022-01-18T19:25:35+5:30 2022-01-18T19:47:40+5:30
Omicron Variant And WHO : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी टेन्शन वाढवलं आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी टेन्शन वाढवलं आहे.
कोरोना टाळण्यासाठी, कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉलचे सतत पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाच्या लसीचा बूस्टर डोसही आला असून, त्यामुळे संसर्ग रोखण्यातही मोठ्या प्रमाणात यश येत आहे.
भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. अशा स्थितीत योग्य उपचार आणि औषधांचीही माहिती हवी. WHO ने नुकतीच कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ज्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दोन नवीन औषधांची शिफारस केली आहे. कोरोनाच्या उपचारात कोणती औषधे वापरावीत आणि कोणती औषधे टाळावीत हे जाणून घेऊया.
WHO च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, बारिसिटिनिब, कॅसिरिविमॅब-इमदेविमॅब, टोसिलिजुमॅब या सरीलूमॅब, रुक्सोलिटिनिब, सोत्रोविमॅब ही औषधे आता कोरोनाच्या उपचारात संक्रमित लोकांना दिली जाऊ शकतात.
तज्ञांनी विशेषतः यामध्ये टोसिलिजुमॅब, बारिसिटिनिब किंवा सरीलूमॅब आणि सिस्टमॅटिक कोर्टिकोस्टेरॉयड सारखी औषधे अधिक चांगली मानली आहेत. त्याच वेळी सोत्रोविमॅब, रुक्सोलिटिनिब, टोफासिटिनिब आणि कॅसिरिविमॅब-इमदेविमॅबही औषधे ऑप्शनल किंवा विशेष परिस्थितीत देण्यास सांगितले आहे.
डब्ल्यूएचओचा दावा आहे की या औषधांमुळे रुग्णालयात जाण्याची आणि व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होते. त्याच वेळी, गंभीर स्थिती आणि मृत्यूचा धोका देखील कमी होतो. यासोबतच काही औषधे न घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
कोरोनाच्या सर्वात धोकादायक दुसऱ्या लाटेत अनेक देशांमध्ये ही औषधे वापरली गेली. WHO ने ज्या औषधांचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे त्यात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, आयवरमेक्टिन, लोपिनाविर/रिटोनाविर आणि रेमेडिसिविर सारख्या औषधांचा समावेश आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या औषधांच्या वापराने स्थिती गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी फारसा पुरावा नाही. अशा परिस्थितीत यातील काही औषधे क्लिनिकल चाचण्यांसाठी पाठवण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
कोरोनाने बाधित मुलांना कॅसिरिविमॅब-इमदेविमॅब औषध दिले जाऊ शकते. लहान मुलांमध्ये कोरोनाची गंभीर प्रकरणे फार कमी प्रमाणात येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. यूएनने म्हटले आहे की जर एखाद्या मुलामध्ये गंभीर लक्षणे दिसली तर त्याच्या उपचारात टोसिलिजुमॅब हे औषध देखील वापरले जाऊ शकते.
डब्ल्यूएचओने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात स्पष्टपणे म्हटले आहे की, कोरोनापासून बचाव करण्याचे सर्वात मोठे शस्त्र कोरोना लस आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांचे रुग्णालयात दाखल होणे आणि मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे.
नवीन बूस्टर डोस देखील लोकांना कोरोनाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी काम करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत.
ओमायक्रॉन संसर्गामुळे आता रुग्णालयांवर मोठा ताण येत आहे. युरोपीय देशांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणा सध्या संकटात असल्याचं पाहायला मिळत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने याआधी आठवडाभरापूर्वी इशारा दिला होता की, आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न केल्यास रुग्णांची संख्या झपाट्याने वाढले तसेच रूग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्व देशांपेक्षा मजबूत सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा असलेल्या फ्रान्स, ब्रिटन आणि स्पेनसारख्या देशांमध्ये देखील आता रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.