...तर पाकिस्तान भारताचा आर्थिक गुलाम बनेल; शरीफ सरकारचा नवा प्लॅन, पाकमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:34 IST2025-03-24T17:12:15+5:302025-03-24T17:34:23+5:30

भारताशी व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान आता ग्रेटर पंजाब बनवत आहे. ग्रेटर पंजाब मॉडेलला पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शहबाज शरीफ यांच्या सरकारी नेत्यांकडूनही समर्थन मिळत आहे. 'ग्रेटर पंजाब'चा अर्थ पाकिस्तान त्यांच्या ताब्यातील पंजाब भारताच्या पंजाबसोबत पुन्हा एकत्र आणणार असं नाही तर करतारपूर कॉरिडोर धर्तीवर आणखी एक व्यावसायिक कॉरिडोर बनवू इच्छित आहेत.

ग्रेटर पंजाबच्या माध्यमातून पाकिस्तान, भारत यांच्यातील व्यावसायिक संबंध मजबूत करण्याची इच्छा पाकिस्तानची आहे. पाकिस्तानी सैन्याचे माजी अधिकारी आदिल राजा यांनी या मॉडेलचा खुलासा केला. पाकिस्तानचा हेतू दोन्ही देशांमध्ये एक सॉफ्ट बॉर्डर बनवायची आहे. शहबाज शरीफ सरकार भारत समर्पित असून या मुक्त व्यापाराच्या माध्यमातून दळणवळण सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा आरोप आदिल राजा यांनी केला.

या मॉडेलमुळे दोन्ही पंजाबमध्ये आर्थिक संबंधाला चालना मिळेल. परंतु पाकिस्तानसाठी हे मॉडेल आव्हानात्मक आहे. भारताची अर्थव्यवस्था महाकाय आहे आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट आहे. ज्यामुळे पाकिस्तान भारताच्या समोर एक क्षणही टिकू शकणार नाही. यातून अधिक नुकसानच सहन करावे लागेल असं आदिल राजा यांनी म्हटलं.

पाकिस्तानचा ग्रेटर पंजाब मॉडेल सिंध(कराची सह) खैबर पख्तूनख्वासोबत ग्रेड टँक रोड आणि भारतामध्ये सीमेवर ढील देत व्यापाराला चालना देणे हे आहे. ज्यातून आर्थिक संधी पाकिस्तानला मिळेल. परंतु या दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेत जमीन आस्मानचं अंतर आहे. जर पाकिस्तान या मॉडेलमागे पळालं तर तो दिवस दूर नसेल जेव्हा पाकिस्तान भारताचा एक सॅटेलाइट स्टेट बनून राहील असं आदिल राजा यांनी दावा केला.

सध्या भारताची इकोनॉमी ४ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने जात आहे तर पाकिस्तान त्यांची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. भारताकडे मजबूत तंत्रज्ञान आहे. त्यांनी आधीच ग्लोबल ट्रेड नेटवर्क उभारलं आहे. ज्याच्यासमोर पाकिस्तानी अर्थव्यवस्था खूप लहान आहे. पाकिस्तान IMF कर्जावर चालू असून भ्रष्टाचाराने देशाला पोखरलं आहे असंही ते बोलले.

जर पंजाब कॉरिडोर मार्गे व्यापार सुरू केला तर पाकिस्तानी व्यापारी भारतीय व्यापाऱ्यांसमोर २ मिनिटे टिकू शकत नाहीत. कारण भारतीय व्यापाऱ्यांकडे एक मजबूत तंत्रज्ञान नेटवर्क आहे. त्यांच्याकडे कुशल कारागीर आहेत. भारताकडे उत्पादन क्षेत्रात भरपूर क्षमता आहे. त्याचा पाकिस्तानवर उलटा परिणाम होईल. त्यातून पाकिस्तानी उद्योग आणि शेती उद्ध्वस्त होईल

पाकिस्तानी सैन्य आणि शहबाज शरीफ यांचं सरकार 'ग्रेटर पंजाब'चा आर्थिक जुगार खेळतंय. त्यातून पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या भारताचा गुलाम बनू शकतो. कमी काळासाठी पाकिस्तानला याचा निश्चित फायदा होईल परंतु पुढे जाऊन पाकिस्तान आर्थिक दृष्टीने भारतावर निर्भर होईल असंही आदिल राजा यांनी म्हटलं.

त्यातून पाकिस्तानचं आर्थिक विभाजन होईल. या मॉडेलमध्ये बलूचिस्तान, दक्षिणी खैबर पख्तूनख्वा नसतील ज्यामुळे या भागातील व्यवसाय संपुष्टात येतील. पाकिस्तान भलेही ग्रेटर पंजाब मॉडेल पुढे करत असेल परंतु भारत आर्थिक दृष्ट्‍या त्यात रस घेऊनही बलूचिस्तानसाठी त्यांचे प्राधान्य कमी करणार नाही. बलूचिस्तानात चीनला रोखणे भारताचा हेतू आहे ज्यातून नुकसान पाकिस्तानचेच होणार आहे.

आदिल राजा याने भलेही आरोप लावले असतील परंतु भारतात ग्रेटर पंजाबसारख्या मॉडेलवर अद्याप कुठलीही चर्चा नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे. पाकिस्तानची जरी इच्छा असली तरी भारत फार विचारपूर्वक यावर निर्णय घेईल यात काही शंका नाही.