नेपाळमध्ये दुर्दैवी अपघातानंतर विमानाची 'अशी' अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 20:23 IST2018-03-12T20:23:48+5:302018-03-12T20:23:48+5:30

नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी बांगलादेशी हवाई कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये विमानातील 67 पैकी 40 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत

ढाका विमानतळावरून उड्डाण केलेल्या या विमानाने काठमांडू विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताच पेट घेतला.

अमेरिका-बांगलादेश सेवा देणाऱ्या या विमानात 67 प्रवासी होते.

आतापर्यंत अनेक प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.