Coronavirus विरोधातील लढ्यात मोठा झटका; जगातील सर्वात प्रभावी लसीचा परिणाम ४१ टक्क्यांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:21 AM2021-10-06T08:21:29+5:302021-10-06T08:32:36+5:30

Coronavirus Vaccine : अभ्यासातून आली बाब समोर. सहा महिन्यांत लसीचा प्रभाव ८८ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत होतोय कमी.

कोरोनाविरोधातील लढ्यात जगातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या लसीबाबत (Most effecive coronavirus Vaccine in world) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. फायझर बायोएनटेकच्या (pfizer biontech vaccine) कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा प्रभाव सहा महिन्यांमध्ये कमी होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. लॅन्सेन्ट मेडिकल जर्नलमध्ये यासंदर्भातील अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.

pfizer biontech ची लस दोन्ही डोस घेतल्यानंतर ८८ टक्के प्रभावी होती, परंतु आता सहा महिन्यांनंतर त्याचा असर ४७ टक्के झाला असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. याचाच अर्थ जगातील सर्वात प्रभावी समजल्या जाणाऱ्या लसीचा असर सहा महिन्यांमध्ये ४१ टक्क्यांनी कमी झाला आहे.

फायझर आणि कॅसर पर्मानंटनं डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीतील कॅसर पर्मानंच सगर्न कॅलिफोर्नियाच्या जवळपास ३४ लाख लोकांचे हेल्थ रकॉर्ड्स तपासून पाहिले. आमचं एक अॅनालिसिस सांगतं की फायझरची लस कोरोनाच्या सर्वा डेल्टा व्हेरिअंटसह चिंताजनक व्हेरिअंटविरोधात प्रभावी असल्याचं या अभ्यासाबाबत बोलताना फायझर लसीचे चीफ मेडिकल ऑफिसर आणि सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट लुई झोडार यांनी सांगितलं होतं.

संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार फायझरची लस घेतल्यानंतर ती डेल्टा व्हेरिअंटविरोधात ९३ टक्के प्रभावी होती. परंतु चार महिन्यांमध्ये तो प्रभाव कमी होऊन तब्बल ५३ टक्के इतका झाला.

तर कोरोनाच्या अन्य व्हेरिअंटविरोधात फायझरच्या लसीचा प्रभाव ९७ टक्क्यांवरून ६७ टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचंही या संशोधनादरम्यान समोर आलं.

दरम्यान, यावरून हे समोर येतं की डेल्टा हे असं व्हेरिअंट नाही की जे लसीचं कवच भेदून जाऊ शकतं, अशी प्रतिक्रिया या संशोधनाच्या प्रमुख लेखिका सारा टॉर्टोफ यांनी सांगितलं.

जर लसीचं कवच डेल्टा व्हेरिअंटनं भेदलं असतं तर आपल्याला कदाचित लसीकरणानंत उच्च संरक्षण मिळालं नसतं. कारण अशा परिस्थितीत लसीकरणानं आपलं काम केलं नसतं, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

अमेरिकेतील आरोग्य संस्था मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या डेटाचा अभ्यास करून कोरोनाच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत निर्णय घेणार आहेत.

अमेरिकेतील एफडीएनं ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे अशा लोकांना फायझर बायोएनटेकच्या लसीच्या बूस्टर डोससाठी मंजुरी दिली आहे. तर सर्वांना बूस्टर डोस देण्यासाठी वैज्ञानिकांनी अधिक डेटाची मागणी केली आहे.