Pfizer ची कोरोना लस टोचल्यावर कसे वाटले? व्हॉलंटिअर म्हणाले "भयानक साईडइफेक्ट" By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 07:45 PM 2020-11-13T19:45:37+5:30 2020-11-13T20:17:29+5:30
CoronaVirus News: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीने मुद्दामहून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी लसीची घोषणा केली नसल्याचा आरोप केला होता. राजकीय वादानंतर आता कंपनीची लस पुन्हा एका मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसवर 90 टक्के परिणामकारक लस बनविल्याची अमेरिकेच्या Pfizer ने केला होता. तसेच ही लस लवकरच लाँचही करण्याची घोषणा कंपनीने केली होती.
यावरून अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीने मुद्दामहून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी लसीची घोषणा केली नसल्याचा आरोप केला होता. राजकीय वादानंतर आता कंपनीची लस पुन्हा एका मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
आता ही कोरोना लस घेतलेले स्वयंसेवक ही लस टोचल्यानंतर कसे वाटले याचे धक्कादायक खुलासे करू लागले आहेत. काही व्हॉलंटिअरनी सांगितले की, ही लस टोचल्यानंतर हँगओव्हर सारखे वाटत होते.
डोके दुखी, ताप आणि स्नायूंचे, मांसपेशींचे दुखणे सुरु झाले होते. जसे की फ्ल्यूच्या लसीमध्ये जाणवते. लसीचा दुसरा टप्पा तर त्याहून गंभीर होता, असेही या स्वयंसेवकांनी सांगितले.
चाचणीमध्ये सहभागी झालेल्या 44 वर्षांच्या ग्लेन डेशील्ड्स यांनी सांगितले की, लस टोचल्यानंतर हँगओव्हर झाला, मात्र लगेचच हे थांबले. 45 वर्षांच्या आणखी एका स्वयंसेवकाने सांगितले की, लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट दिसून आले. दुसरा डोस दिल्यानंतर दुखण्याचे प्रमाण वाढले.
फायझरच्या या लसीची चाचणी 6 देशांतील 43500 जणांपेक्षा अधिक स्वयंसेवकांवर घेण्यात आली आहे. तिसऱ्या टप्यातील ही आकडेवारी आहे.
कोरोना लसीची चाचणी घेण्यासाठी आलेल्या लोकांना लस खरोखरीच टोचली की नाही ते माहित नव्हते. यापैकी निम्म्याच लोकांना कोरोना लस टोचण्यात आली होती.
असे यासाठी करण्यात आले होते, कारण ग्रुपला इन्फेक्शनचा किती धोका आहे हे समजू शकेल. कोरोना लसीने काम केले की नाही ते यावरून लक्षात येते.
फायझरची ही लस 90 टक्के परिणामकारक असली तरीही मोठे आव्हान म्हणजे ही लस लोकांपर्यंत पोहोचविणे आहे. कारण ही लस उणे 70 डिग्री सेल्सिअल तापमानात ठेवावी लागते. साध्या फ्रिजमध्ये ही लस 24 तासही टिकत नाही.
ट्रायलमध्ये कोरोना लसीने त्रास दिला असला तरीही शेवटी निकाल चांगले आले आहेत. यामुळे कोरोना जगातून घालविण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.