Picturesque trees all over the world; You will be amazed to see it too!
जगभरातली चित्र-विचित्रं झाडं; तुम्हीही पाहून व्हाल थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 05:47 PM2019-07-30T17:47:28+5:302019-07-30T17:51:12+5:30Join usJoin usNext बोटलचं झाड- या झाडाची जमिनीवरच्या सर्वात घातक झाडांमध्ये नोंद केली जाते. या झाडातून निघणारा रस विषारी असतो. जुन्या काळात शिकारी या झाडाच्या रसाचा वापर करायचे. बाणाला या झाडाचं विष लावून पहिल्यांदा शिकारी शिकार करत होते. वावोना झाड– रेडवूड (Wawona Tree)- अमेरिकेच्या योसमाइट राष्ट्रीय उद्यानात मेरिपोसा ग्रोवमध्ये स्थित असलेल्या झाड फारच विशालकाय आहे. 1881मध्ये हे झाड कापून त्यातून रस्ता बनवण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांमध्ये हे झाड आकर्षणाचं केंद्र आहे. टीपॉट बाओबाब (Teapot Baobab) –1000 वर्षं जुनं हे झाड मेडागास्करमध्ये आढळतं. या झाडाची उंची जवळपास 80 मीटरच्या जवळपास आहे. तर झाडाचा बुंदा 25 मीटरहून जास्त मोठा आहे. श्रावण महिन्यात या झाडांना फुलं लागल्यानंतर ते फक्त 24 तास टिकतात, त्यानंतर फांद्या तुटून जातात. सिल्क कॉटन ट्री (Silk Cotton Trees of Ta Prohm)- दक्षिण पूर्व आशियातल्या Ta Prohm मंदिराची खासियत हे तिकडचं झाड आहे. या झाडाच्या मुळांनी या मंदिराला चारही बाजूंनी वेढलेलं आहे. हायपेरियन (Hyperion)- हे जगातलं सर्वात उंच झाड आहे. या झाडाचं आयुष्य 1200 ते 1800 वर्ष आहे. हायपेरियन झाडाची लांबी जवळपास 115.5 मीटर आहे. तसेच हे झाड 9 मीटर रुंद आहे. या झाडाची उंची न्यूयॉर्कच्या स्टेच्यू ऑफ लिबर्टीहून उंच आहे.