जगातील असं ठिकाण जिथं दरवर्षी मातीतून निघतं १ लाख किलो सोनं! By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:46 PM 2021-03-10T12:46:24+5:30 2021-03-10T12:51:42+5:30
जागतिक बाजारपेठेत सोन्याचं महत्व किती आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सोनं या मौल्यवान धातूचं उत्पादन देखील जगात काही मोजक्या देशांमध्ये होतं. जगात एक असं ठिकाण आहे जिथं मातीत सोनं सापडतं. या ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात... जगभरात सोन्याच्या खाणी अनेक आहेत. पण त्यापैकी Nevada Gold Mine नावाची खाण सर्वात खास आहे.
सोन्याच्या खाणीत दरवर्षी कोट्यावधी किलो सोने बाहेर पडते. Nevada येथे जगातील बहुतेक सोनं इथल्या खाणींमध्ये बाहेर पडतं.
नेवाडा गोल्ड माईनमध्ये दरवर्षी इथे ११५ ते १७० टन सोनं काढलं जातं. म्हणजे जवळपास १ लाख ७० हजार किलो.
अमेरिकेतील नेवाड्यात खाणकाम हा सर्वात मोठा उद्योग आहे. नेवाडाच्या सोन्याच्या खाणीत सर्वाधिक सोने काढले जाते. हे अमेरिकेतील एक शहर आहे आणि इथे सगळ्यात जास्त सोनं मिळवलं जातं.
सन २०१८ मध्ये नेवाडा येथे तब्बल ५,५८१,१६० ट्रॉ औंस (१७३.६ टन) उत्पादन केले गेले होते.
अमेरिकेतील एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी ७८ टक्के सोनं नेवाड्यात काढलं जातं. तर जगात एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी ५ टक्के वाटा हा एकट्या नेवाड्यातील खाणींचा आहे.