pm Modi kept two special men away from Ladakh increases tension for china
मोदींनी दोन 'खास' माणसांना लडाखपासून दूर ठेवले अन् चीनचे टेन्शन वाढले By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 09:04 PM2020-06-04T21:04:56+5:302020-06-04T21:21:09+5:30Join usJoin usNext कोरोनामुळे संपूर्ण जगात टीकेचा धनी झालेल्या चीननं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अतिशय विचारपूर्वक वाढवला. जगाचं लक्ष कोरोनापासून दूर करण्यासाठी चीननं लडाखचा मुद्दा उपस्थित केला. संपूर्ण जगाचं लक्ष कोरोनापासून हटवून भारत आणि चीनकडे यावं, यासाठी चीननं जाणीवपूर्वक लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला. मात्र चीनची योजना भारतानं धुळीस मिळवली. लडाखमध्ये वाद निर्माण होताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीसाठी हात पुढे केला. मात्र हा द्विपक्षीय मुद्दा आहे. तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतली. लडाख प्रश्न पूर्णपणे दोन देशांचा मुद्दा आहे, असा स्पष्ट संदेश भारतानं जगाला दिला. जवळपास महिना होऊन गेला तरीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय जवान हटले नाहीत. पंतप्रधान मोदी लडाखमधील तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पाठवतील, अशी अपेक्षा चीनला होती. चीनच्या अपेक्षेवर भारतानं थंडगार पाणी ओतलं. शत्रूला ज्याची अपेक्षा असते, तेच द्यायचं नाही, शत्रूला अपेक्षित गोष्टी करायच्या नाहीत, हा व्यूहनीतीचा, कुटनीतीचा नियम मोदींनी वापरला. त्यामुळे चीनला धक्का बसला. चीननं १९६२ मध्ये भारताविरुद्ध युद्ध केलं. त्यावेळी तिथल्या सरकारची ग्रेट लीप योजना अपयशी ठरली होती. चिनी जनतेमध्ये निराशा होती. सरकारबद्दल रोष होता. त्यामुळेच चीननं भारताविरोधात युद्ध पुकारलं. आता २०२० मध्ये संपूर्ण जगात चीनच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. चीनमुळेच कोरोना पसरला, चीननं कोरानाची माहिती जगाला फार उशिरा दिली, अशी ठाम भावना जगात आहे. आपल्याबद्दल निर्माण झालेला अविश्वास दूर करायचा असल्यास कोरोनाचा विषय चर्चेतून दूर करावा लागेल, याची जाणीव चीनला आहे. त्यामुळेच चीननं जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी लडाखचा मुद्दा उकरून काढला. भारतानं अतिशय संयतपणे, संयमानं लडाखचा वाद हाताळला. भारतावर दबाव टाकल्यावर त्यांचं सैन्य मागे हटेल, लडाख परिसरातील लष्करी बांधकामं थांबतील, असा चीनचा होरा होता. तो सपशेल चुकला आहे. चीननं लडाखमधील लष्करी कुमक वाढवताच भारतानं ५ हजार जवान तिथे तैनात केले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पाठवला. बोफोर्स तोफा पाठवण्याची तयारी सुरू केली. याशिवाय लढाऊ विमानांसाठी धावपट्टी तयार करण्याच्या कामाला गती दिली. भारत कोरोना संकटात आहे. त्यांची अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फारसं प्रत्युत्तर मिळणार नाही, असा चीनचा अंदाज होता. तो संपूर्णपणे चुकला आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याचीननरेंद्र मोदीअजित डोवालcorona viruschinaNarendra ModiAjit Doval