गोल्डन पॅलेस, ७००० कारचे कलेक्शन..., लग्झरी लाईफस्टाईल असलेल्या ब्रुनेईचे सुलतान यांची भेट घेणार PM नरेंद्र मोदी! By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:18 AM 2024-09-03T09:18:23+5:30 2024-09-03T09:34:42+5:30
PM Narendra Modi to visit Brunei : ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची लाईफस्टाईल खूपच लग्झरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (३ सप्टेंबर) ब्रुनेईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. सुलतान हाजी हसनल बोल्किया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दारुसलामला भेट देणार आहेत.
यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची लाईफस्टाईल खूपच लग्झरी आहे.
सात हजार गाड्यांव्यतिरिक्त, बोल्कियाकडे खाजगी जेट सुद्धा आहे. सुलतान हाजी हसनल बोल्किया यांनी १९६७ मध्ये ब्रुनेईच्या गादीवर आले. त्यावेळी ते फक्त २१ वर्षांचे होते.
४.५ लाख लोकसंख्या असलेल्या ब्रुनेईवर ६०० वर्षांपासून बोल्किया कुटुंब राज्य करत आहे. सुलतान हाजी हसनल हे बोल्किया राजघराण्याचे २९ वे वारसदार आहेत. तसेच, ते ब्रुनेईचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री देखील आहेत.
ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. २००९ मध्ये फोर्ब्सनुसार सुलतान हाजी हसनल बोल्किया यांची संपत्ती १.३६ लाख कोटी रुपये होती. मात्र, अलीकडील रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, आता त्यांची संपत्ती २.८८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत तेलाचे साठे आणि नैसर्गिक वायू आहे. ब्रुनेईमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. याचबरोबर, ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया यांचा दोन दशलक्ष स्क्वेअर फूट पसरलेला राजवाडा आहे, जो १९८४ मध्ये बांधला होता.
'इस्ताना नुरुल इमान पॅलेस' हा जगातील सर्वात मोठा पॅलेस असून त्याचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुलतानच्या पॅलेसची किंमत २२५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
सुलतानचा राजवाडा इस्ताना नुरुल इमान पॅलेसमध्ये १७०० खोल्या, २५७ बाथरूम, ५ स्विमिंग पूल आणि ११० गॅरेज आहेत. या पॅलेसचा घुमट २२ कॅरेट सोन्याने मढवला आहे. याशिवाय पॅलेसच्या भिंतींवरही सोन्याने डिझाईक करण्यात आलेले आहे.
ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया यांनाही गाड्यांची खूप आवड आहे आणि त्यांच्याकडे जवळपास सात हजार कार आहेत. यामध्ये ६०० रॉल्स राइस, ३०० फेरारी, १३४ कोएनिगेग्स, ११ मॅक्लेरेन एफ १ एस, ६ पोर्शे, ९६२ एसएस आणि अनेक जॅग्वार कारचा समावेश आहे.
या कार ठेवण्यासाठी त्यांच्या पॅलेसमध्ये ११० गॅरेज बांधण्यात आले आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे बोईंग ७४७-४००, बोईंग ७६७-२०० आणि एअरबस ए३४०-२०० अशी खाजगी विमाने आहेत.
रिपोर्टनुसार, ब्रुनेईच्या सुलतान हाजी हसनल बोल्किया यांच्या मालकीच्या खाजगी जेटमध्येही सोनं आहे, ज्याची किंमत सुमारे ३३५९ कोटी रुपये आहे. विमानाच्या आतील वॉश बेसिन देखील सोन्याचे बनलेले आहे. एवढेच नाही तर जेटच्या फरशीवर सोनेरी तार असलेले कार्पेटही टाकण्यात आले आहे.
या जेटमध्ये लिव्हिंग रुमपासून अनेक बेडरूम आणि लक्झरी लाईफस्टाईलपर्यंत सर्व गोष्टींची व्यवस्था आहे. ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया यांनी तीन विवाह केले आहेत.
ब्रुनेईच्या सिंहासनावर बसण्याच्या दोन वर्षांपूर्वी, १९६५ मध्ये त्यांनी पेंगिरन अनक हाजा सालेहा यांच्याशी लग्न केले. यानंतर त्यांनी १९८१ मध्ये मरियम अब्दुल अजीज आणि २००५ मध्ये अझरीनाज मजहर यांच्याशी लग्न केले. दरम्यान, त्यांनी २००३ मध्ये मरियम आणि २०१० मध्ये अझरीनाज यांना घटस्फोट दिला.