position of china at galwan valley in ladakh amid india china tension on border
India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:29 PM2020-06-16T17:29:24+5:302020-06-16T17:55:16+5:30Join usJoin usNext लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) भारत आणि चीनदरम्यान जबरदस्त चकमक उडाली आहे. यात एक भारतीय अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. तर चीनचे पाच सैनिक ठार झाले आहेत. वशेष म्हणजे सोमवारी गलवान खोऱ्याजवळ, दोन्ही देशांत चर्चेनंतर वातावरण शांत होत असतानाच ही घटना घडली आहे. गलवान खोरे हा लडाखचा भाग आहे. येथूनच गलवान नदीही वाहते. 1962च्या युद्धातही दोन्ही देश येथेच समोरासमोर आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त भागात टेन्ट लावणे ही चीनी सैन्याची रणनीती आहे. असे करण्यापासून रोखल्यानतंर यापूर्वीही चीनी सैन्य आणि भारतीय लष्करात झटापट झाली आहे. गलवान खोऱ्यात चीनी इन्फ्रास्ट्रक्चर - गलवान नदी पूर्व लडाखमध्ये आहे. येथे सैनिकांच्या चौक्याही होत्या. मात्र, या चौक्यांवर ह्युमन सिसोर्स आणि फायरपावर फारसे चांगले नव्हते, जे चीनी सैन्याचा प्रतिकार करायला सक्षण ठरेल. सॅटेलाइटच्या छायाचित्रांवरून समजते, की चीनने 2016पर्यंत, गलवान खोऱ्याच्या मध्यापर्यंत पक्का रस्ता तयार केला आहे. असे ही मानले जाऊ शकते, की भविष्यात हा रस्ता चीन सेक्टरमधील एलएसीपर्यंतच्या एखाद्या ठिकाणापर्यंत वाढवेल. याशिवाय चीनने नदी खोऱ्यातही चौक्या तयार केल्या आहेत. या चीनी सैनिकांना गस्तीच्या वेळी कामी येतात. चीनचे सर्वात मोठे तळ हेविएटनमध्ये आहे. ते 48 किलोमीटर ईशान्य दिशेला आहे. काल मोठ्या रात्री झालेली चकमकही गलवान खोऱ्यातच झाली. यापूर्वी 5-6 मेरोजी चीन सैनिकांची आणी भारतीय जवानांची पेंगाँग त्सो सरोवरावळ झटापट झाली होती. पेंगाँग त्सो सरोवरावळ झटापटीच्या घटनेनंतर, भारत-चीन सीमेवरील ज्या-ज्या ठिकाणी दोन्ही देशांच्या जवानांत झटापटी वाढल्या आहेत, त्या भागात जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. भारताने निर्धारित केलेल्या LACला ओलांडून जेव्हा चीनी सैनिक पेंगाँग सरोवर आणि गलवान खोऱ्याजवळ आले, तेव्हापासून हा वाद वाढला आहे. चीनने येथे जवळपास पाच हजार सैन्य तैनात केले होते, तसेच शस्त्रसाठाही जमवला होता.टॅग्स :सीमा वादसीमारेषाचीनभारतलडाखborder disputeBorderchinaIndialadakh