A powerful earthquake in Mexico, killing more than 200
मॅक्सिकोत शक्तिशाली भूकंप, 200 हून अधिक ठार By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 10:44 PM2017-09-20T22:44:32+5:302017-09-20T22:47:56+5:30Join usJoin usNext मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरली. या भूकंपात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. या भूकंपाच्या दुर्घटनेनंतर मॅक्सिकोमधील लोक रस्त्यावर उतरून सैरावैरा पळत होते. मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही राष्ट्रपती पेना निएटो यांनी दिली आहे. भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं. दोन आठवड्यांपूर्वीच मॅक्सिकोच्या दक्षिणेकडच्या भागात झालेल्या भूकंपात 90 लोकांचा मृत्यू झाला होता. मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे.