डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाची पर्वा न करता पॅरिस क्लायमेट कराराला असा पाठिंबा मिळतो आहे.मॉनट्रेयरमधील प्रसिद्ध "हॉटेल दे व्हिले" पॅरिस कराराला पाठिंबा देतं आहे.मॅक्सिको शहर पॅरिस कराराशी आपली बांधिलकी दाखवतो आहे. मॅक्सिकोतील वास्तू हिरव्या रंगात उजळल्या आहेत.वॉश्गिटन डीसीने नेहमीच पॅरिस कराराला पाठिंबा दाखविला होता. त्यासाठीच तेथील व्हिलसन बिल्डिंगच्या तळभागात हिरव्या एलईडीची रोषणाई केली आहे.बोस्टनचे मेयर मार्टी वॉल्श यांनी पॅरिस कराराला पाठिंबा दिला आहे. कराराला पाठिंबा दर्शविण्यासाठी बोस्टनमधील सिटी हॉल हिरव्या रंगात उजळला आहे.न्यूयॉर्कमधील सिटी हॉल हिरव्या एलईडी लाइट्सने उजळला आहे. न्यूयॉर्क सिटीला पॅरिस क्लायमेट कराराचा अभिमान आहे.न्यूयॉर्कमधील कॉस्च्युस्को ब्रिजला हिरवी रोषणाई करण्यात आली आहे.न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हिरव्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. लोकांच्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी पॅरिस क्लायमेट कराराला दिला जातो आहे.