कासीम सुलेमानींवर हजारोंच्या उपस्थित अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 08:44 PM2020-01-04T20:44:04+5:302020-01-04T20:57:14+5:30

इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले.

मेजर जनरल कासीम सुलेमानी असे या अधिकाऱ्याचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते.

मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

हे लोक कासीम सुलेमानी यांचे फोटो हातात घेऊन शोक व्यक्त करत होते.

अमेरिकेने केलेला हा हल्ला भ्याड असून दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया इराणकडून आली आहे. तर अमेरिकेतही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

अमेरिका- इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बगदादच्या अमेरिकन दुतावासावर इराणच्या पुरस्कृत संघटनेने हल्ला चढविला होता. याचा बदला म्हणून अमेरिकेने गेल्या चार दशकांपासून हवा असलेल्या कासीम सुलेमानी यांचा खात्मा केला आहे.