"वातावरण खूप जास्त भयंकर होतं..."; अमेरिकेतून परतलेल्या रंजनीनं सांगितलं डिपोर्टेशनचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 22:44 IST2025-03-18T22:40:45+5:302025-03-18T22:44:35+5:30

कोलंबिया यूनिवर्सिटीत शिकणारी भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिने स्वत:ला अमेरिकेतून डिपोर्ट केले आहे. तिचा स्टुडेंट व्हिसा रद्द करण्यात आला होता. रंजनी श्रीनिवासन हिने तिच्यासोबत अमेरिकेत घडलेला प्रसंग सगळ्यांना सांगितला आहे.
रंजनी हिने न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना जेव्हा फेडरल इमिग्रेशन एजेंट पहिल्यांदा माझ्या विद्यापीठात आले तेव्हाचा तिच्यासोबत घडलेला थरारक प्रसंग सांगितला आहे. इमिग्रेशन एजेंट ३७ वर्षीय रंजनीला शोधत होते, जेणेकरून तिला ताब्यात घेऊ शकतील.
इमिग्रेशन एजेंट येण्याआधीच रंजनीला आपला स्टुडेंट व्हिसा संपल्याचं लक्षात आले. तिच्या इमारतीत ३ इमिग्रेशन एजेंट आले होते, परंतु पीएचडी स्टुंडेट रंजनी हिने भीतीपोटी दरवाजा खोलण्याची हिंमत दाखवली नाही.
एजेंट सातत्याने दरवाजा ठोठावत होते, एक दिवसानंतर पुन्हा एजेंटस तिच्या दरवाजावर आले होते. परंतु तेव्हा रंजनी तिथे नव्हती. तिने काही सामान पॅक करून लागार्डिया एअरपोर्ट गाठले. तिथून तिने कॅनडासाठी फ्लाईट पकडली आणि अमेरिका सोडून दिले
जेव्हा एजेंट तिसऱ्यांदा कोर्टाची ऑर्डर घेऊन एजेंट रंजनीच्या अपार्टमेंटमध्ये पोहचले तोपर्यंत ती तिथून निघून गेली होती. वातावरण खूप जास्त अस्थिर आणि भयंकर वाटत होते त्यासाठी मी अमेरिका तातडीने सोडण्याचा निर्णय घेतला असं रंजनीने म्हटलं.
परराष्ट्र विभागाने ५ मार्चला रंजनी श्रीनिवासनचा स्टुडेंट व्हिसा रद्द केला होता. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने ११ मार्च रोजी कस्टम एँन्ड बॉर्डर प्रोटेक्शन होम App चा वापर करून रंजनीने स्वत:ला डिपोर्ट केल्याचा व्हिडिओ मिळाल्याचं सांगितले आहे.
जेव्हा पहिल्यांदा फेडरल इमिग्रेशन अधिकारी रंजनीच्या शोधासाठी तिच्या अपार्टमेंटमध्ये पोहचले तेव्हा तिला काहीच समजलं नाही. अचानक परराष्ट्र खात्याने कुठलीही सूचना न देता व्हिसा का रद्द केला तो प्रश्न रंजनीला पडला आहे.
व्हिसा रद्द झाल्याने कोलंबिया यूनिवर्सिटीतून तिचा प्रवेश रद्द झाला आहे. रंजनी हिचा व्हिसा करण्याचं कारण दुसऱ्या दिवशी पुढे आले. होमलँड डिपार्टमेंटने रंजनीचा व्हिसा कथितपणे फिलिस्तानी दहशतवादी समुह हमासचं समर्थन करणाऱ्या हालचालीत समाविष्ट असल्याचं कारण देत रद्द केला होता
मागील ५ वर्षापासून रंजनी श्रीनिवासन कोलंबिया यूनिवर्सिटीत प्रवेशासाठी प्रयत्न करत होती. माझा व्हिसा रद्द केला, माझं स्टुडेंट स्टेटस संपवले, त्यामुळे माझं भविष्य उद्ध्वस्त झालं आहे. मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केला, कुठलेही चुकीचे काम केले नाही असं रंजनीने एका मुलाखतीत सांगितले.