#RatanTata : टाटा समूहाचे रतन टाटा यांच्या आयुष्यातील ही ५ तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 17:32 IST2017-12-28T16:55:50+5:302017-12-28T17:32:47+5:30

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ला टाटा या श्रीमंत कुटूंबात झाला होता. नवल टाटा आणि सूनू हे त्यांचे आई-वडील तर टाटा समुहाचे संस्थापक आणि मालक जमशेदजी टाटा हे त्यांचे आजोबा.

मात्र त्यांच्या लहानपणीच त्यांना एक धक्का बसला. ते अवघे ७ वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर त्यांचं पुर्ण पालन-पोषण त्यांच्या आजीने केलं.

मुंबईच्या कॅम्पियन स्कुलमध्ये शिकत असताना ते शिमल्याच्या बिशप कॉटन स्कुलमध्ये गेले आणि तेथे शिकले. तिथून परतल्यानंतर त्यांनी कॅथ्रेडल अॅन्ड जॉन कॉनन स्कुलमध्ये आपलं शिक्षण पुर्ण केलं. नंतर हार्वर्ड बिझनेस स्कुलमधून त्यांनी 1975साली आपलं शिक्षण पुर्ण केलं.

जे.आर.डी.टाटांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी आयबीएममधून आलेली जॉब ऑफर नाकारून त्यांनी आपल्या फॅमिली बिझनेसला मदत करायचे ठरवले.

आपल्या उत्कृष्ट नेतृत्व आणि कौशल्यांमुळे १९८१ला टाटा समुहाचे चेअरमन म्हणून त्यांनी आपला पदभार स्विकारला. त्यांच्या अमुल्य योगदानामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांना 'पद्मभुषण' आणि 'पद्मविभूषण' पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.