recovered coronavirus patients blood selling at dark web kkg
CoronaVirus News: कोरोनातून बऱ्या झालेल्यांच्या रक्ताची ऑनलाईन विक्री; किंमत पाहून चक्रावून जाल By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 03:58 PM2020-05-02T15:58:19+5:302020-05-02T16:18:11+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ३४ लाखांच्या घरात गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास २ लाख ४० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताची इंटरनेटवर अवैध विक्री केली जात आहे. कोरोनाचे उपचार आणि लसीच्या नावाखाली बऱ्या झालेल्या रुग्णांचं रक्त डार्कनेटवर विकलं जात आहे. डार्कनेटवरील विक्रेते विविध देशांमधून कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्ताची विक्री करत आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असल्याचा दावा करत कोरोनावर मात केलेल्यांच्या रक्ताची विक्री केली जात आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचं रक्त प्रति लीटर १० लाख रुपयांना विकलं जात आहे. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींच्या रक्तासोबतच पीपीई, मास्क, टेस्ट किट यासह इतर सामानदेखील चढ्या दरानं विकलं जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या अहवालानुसार कमीत कमी १२ डार्कनेटवर रक्तासोबतच पीपीई, मास्क, टेस्ट किटची विक्री केली जात आहे. डार्कनेटवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू जगभरात पोहोचवल्या जात आहेत. हा प्रकार अवैध असून तो धोकादाक असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठानं अहवालात म्हटलं आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus