जबदरस्त! कोरोना व्हायरसला नष्ट करणारा पहिला मास्क, या अनोख्या मास्कची खासियत वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 02:34 PM2020-06-19T14:34:59+5:302020-06-19T14:50:55+5:30

इस्त्राइलच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, त्यांनी एक रियूजेबल म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येणारा मास्क तयार केलाय.

कोरोना व्हायरसचं संक्रमण जगभरात दिवसेंदिवस वाढतच आहेत. तर दुसरीकडे याबाबत वेगवेगळे रिसर्चही सुरू आहेत. अशातच अनेक रिसर्चमधून या व्हायरसपासून बचावासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या महत्वावर जोर देण्यात आलाय.

यात मास्कला सर्वात जास्त फायदेशीर मानलं गेलंय. पण मास्कची ठेवण आणि एकदा वापरल्यावर पुन्हा वापरण्यातही काही समस्या आहेत. याचं समाधान इस्त्राइलच्या वैज्ञानिकांनी रियूजेबल मास्क तयार करून शोधून काढलंय.

इस्त्राइलच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, त्यांनी एक रियूजेबल म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येणारा मास्क तयार केलाय. या मास्कची खासियत म्हणजे यात फोन फोन चार्जरमधून ऊर्जा घेऊन कोरोना व्हायरसला उष्णतेने नष्ट करेल.

हाफियाच्या टेनियन युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांच्या टीमचे मुख्य याइर इन-इली यांनी सांगितले की, 'या मास्कची विसंक्रमण प्रक्रियेत 30 मिनिटांचाच वेळ लागेल. आणि जेव्हा हा मास्क चार्जरशी जोडलेला असेल तेव्हा याचा वापर अजिबात करू नये.

या मास्कला एक यूएसबी पोर्ट असेल जे पॉवर सोर्सला जोडलेलं असेल. या चार्जरने मास्कला आतील कार्बन फायबरचा थर 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम होईल ज्याने व्हायरस मारला जाईल.

इन-इली म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या वैश्विक महामारीत मोठ्या प्रमाणात मागणी असलेले प्रचलित डिस्पोजेबल मास्क ना आर्थिक रूपाने आणि ना पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. आम्हाला एक पुन्हा वापरता यावा असा मास्क तयार करायचा होता. तो आम्ही केला.

असं असलं तरी प्राध्यापक एलोन मोसेज जे येरूशलमच्या हादसाह मेडिकल सेंटरमध्ये संक्रामक रोगांचे तज्ज्ञ आहेत ते म्हणाले की, या गोष्टीबाबत जराही शंका नाही की, अर्ध्या तासात 70 डिग्री सेल्सिअस उष्णतेने कोरोना व्हायरस नष्ट होईल.

पण त्यासोबतच मोसेस म्हणाले की, पुन्हा पुन्हा गरम केल्याने मास्कचा पेपर आणि फ्रॅब्रिकच्या संक्रमण रोखण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडू शकतो.

इन-इली म्हणाले की, टेस्टिंग दरम्यान प्रोटोटाइप मास्कला 20 वेळ गरम करण्यात आले होते. प्रत्येक वेळी अर्ध्या तासासाठी पण याचा मास्कवर काही प्रभाव पडला नाही.

ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही समस्येशिवाय नक्कीच काही वेळा याचा वापर करण्याची गॅरन्टी देऊ शकतो. हा मास्क एन95 सारखा आहे. ज्यात समोर एक व्हॉल्व असतो आणि मागे बांधण्यासाठी पट्टीही आहे.

वैज्ञानिकांनी या मास्कच्या पेटंटसाठी अमेरिकेत मार्च महिन्याच्या शेवटी अर्ज केलाय. आता हा मास्क बाजारात आणण्याची तयारी केली जात आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, या मास्कची किंमत बाजारात असलेल्या मास्कपेक्षा एक डॉलर अधिक ठेवू.