CoronaVirus News : बापरे! घरी राहणाऱ्यांना बाहेरपेक्षा कोरोनाचा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 08:43 AM2020-11-17T08:43:53+5:302020-11-17T09:13:06+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मात्र याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल पाच कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट असून पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून चाचण्यांना यश येत आहे.

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. कोरोनाचा वेग मंदावतानाचे चित्र आहे. तसेच रिकव्हरी रेट म्हणजेच बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मात्र याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. घरात असणाऱ्या मंडळींना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे.

जे लोक घरात (Indoor) राहतात त्यांना बाहेर असणाऱ्या लोकांपेक्षा कोरोना व्हायरसचा धोका हा अधिक असतो. डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून त्यामागचं कारण देखील सांगितलं आहे.

अमेरिकेचे माजी सर्जन जनरल भारतवंशी डॉ. विवेक मूर्ती (Dr Vivek Murthy) यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका हा बाहेरील (Outdoor) पेक्षा आतमध्ये (indoor) राहणाऱ्यांना जास्त असतो असं म्हटलं आहे.

"आता हिवाळा आहे. अशा वेळी प्रत्येकजण बाहेर पडण्याऐवजी आतच राहणं पसंत करतात आणि हीच परिस्थिती कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यासाठी सर्वात जास्त अनुकूल आहे."

"आधी लोक आपल्याच घरात राहत असे. म्हणजे व्हायरसच्या भीतीने बाहेर जास्त बाहेर जात नसे. मात्र आता ते एकमेकांच्या घरी जात आहेत. लोक पार्टीसाठी, डिनरसाठी एकत्र जमत आहेत."

कोरोनाचा वेग हा त्यामुळेच वाढल्याचं डॉ. विवेक मूर्ती यांनी म्हटलं आहे. डॉ. मूर्ती सध्या कोरोना नियंत्रित करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांनी स्थापन केलेल्या सल्लागार समितीचे सह-अध्यक्ष आहेत.

एका प्रश्नाचं उत्तर देताना "कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास कोणत्याही हेतूशिवाय लॉकडाऊन करणं अनावश्यक आहे. यापासून आर्थिक व्यवस्था बिघडण्याखेरीज काहीही मिळणार नाही" असं डॉ. मूर्ती यांनी म्हटलं आहे.

कोरोना कसा थांबवायचा आणि स्वतःचे रक्षण कसे करावे हे आपल्यावर अवलंबून आहे असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना व्हायरस हा हृदय आणि फुफ्फुसांवर अटॅक करत असून रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिपोर्टमधून हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.

हरियाणा आरोग्य विभागाच्या डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली असून गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोरोना व्हायरस हा फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवत आहे. यामुळे अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच रुग्णांच्या रक्ताच्या गुठल्या होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.