'या' द्राक्षांची किंमत ऐकुन तुम्ही म्हणाल सोनं खरेदी करणं परवडेल, घडातील एक द्राक्ष ३५ हजार रुपयांना By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 04:42 PM 2021-09-26T16:42:21+5:30 2021-09-26T18:30:48+5:30
आतापर्यंत अनेकदा द्राक्षं खाल्ली असतील. मात्र किती रुपये किलोची द्राक्ष खाल्ली असतील? ५०, १००, २०० रुपये किलोपर्यंतच्या द्राक्षांचा स्वाद घेतला असेल. मात्र ३५ हजार रुपयांना केवळ एक द्राक्ष खाल्लंय का? ऐकून धक्का बसला ना पण अहो असं द्राक्ष आहे. ही द्राक्ष सोन्यापेक्षाही महाग असून ही द्राक्ष विकत घेण्यापेक्षा सोनं परवडेल अस तुम्ही म्हणाल... तुम्ही हिरवी द्राक्षं खाल्ली असतील, काळी द्राक्षंही खाल्ली असती. या फोटोतील ही लालबुंद द्राक्ष पाहून ती खाण्याचाही मोह तुम्हाला आवडला नसेल. पण त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तुमची तयारी हवी.
रुबी रोमन द्राक्षे (Ruby Roman grapes) असं या द्राक्षांचं नाव आहे. ही दिसायला जितकी सुंदर तितकीच त्याची किंमतही भारी अगदी. अगदी सोन्याच्या भावात ही द्राक्षं विकली जातात.
ही द्राक्ष जापानमधील असून या प्रकारच्या द्राक्षांच्या केवळ २ हजार ४०० घडांचं उत्पादन घेतलं जातं.
अत्यंत साध्या पद्धतीनं याची शेती केली जाते. या द्राक्षांची शेती जपानी लक्झरी फळांच्या बाजारात अत्यंत डिमांडिंग आहे.
२००८ मध्ये संशोधन करून नव्या प्रीमियम द्राक्षांचं वाण विकसित करण्यात आलं आहे.
सर्वात महागड्या द्राक्षांची निर्मिती करण्यासाठी तब्बल १४ वर्ष प्रयत्न करण्यात आले. तसेच १४ वर्ष गुंतवणूक करावी लागली. तेव्हा जाऊन ही शेती करणं शक्य झालं.
या द्राक्षांची विक्री होण्यापूर्वी प्रत्येक द्राक्षाची गुणवत्ता तपासली जाते. यातून जे द्राक्षे निवडली जातात त्यानंतर त्याला सर्टिफाय करण्यात येतं. ही द्राक्षे विकण्यासाठी कडक नियम आहेत.
या एका द्राक्षाची किंमत सुमारे ३५ हजार रुपये आहे. एक किलो द्राक्षं घ्यायची असतील तर भारतात तुम्हाला यासाठी तब्बल ७ लाख ५० हजार रुपये मोजावे लागती.
अधिकृत रूबी रोमन वेबसाइटनुसार ही द्राक्ष कमी आंबट असतात. त्यामध्ये साखर आणि रस यांचे प्रमाण जास्त असते. एक द्राक्ष खाताच तुमचे तोंड त्या द्राक्षाच्या रसाने पूर्णपणे भरुन जाते.
पिंगपाँग बॉलएवढ्या प्रत्येक द्राक्षाचं वजन २० ग्रॅम असतं इतकच नाही तर 3 सेमी पर्यंत या द्राक्षाचा आकार असू शकतो असा दावा आहे.