Russia: heavy snowfall in Moscow, death of one
रशिया : मॉस्कोमध्ये तुफान बर्फवृष्टी, एकाचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 05:59 PM2018-02-05T17:59:04+5:302018-02-05T18:04:50+5:30Join usJoin usNext रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मॉस्कोमध्ये शनिवारपासून (3 फेब्रुवारी) जोरदार वारे वाहत असून, तुफान बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मॉस्कोच्या इतिहासात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी बर्फवृष्टी असल्याचं सांगितलं जात आहे. मॉस्कोमधील अधिका-यांनी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. झाड अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरभरात जवळपास दोन हजार झाडं पडली आहेत. बर्फवृष्टीमुळे तीन हजारांहून जास्त घरांतील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. टॅग्स :बर्फवृष्टीSnowfall